नगरसेवक गणेश वाईंगडे


 हुपरीतील श्री अंबाबाई मंदिर अंशतः सुरु करा..

नगरसेवक गणेश वाईंगडे 

PRESS MEDIA LIVE : हुपरी :

कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर केलेमुळे मार्च महिन्यापासून सर्व उद्योग, व्यापार तसेच मंदिरेही बंद करणेत आली होती. कोरोना आपत्ती वातावरणात सुधारणा होत असल्याने शासनाने आता अनलॉक जाहीर केले. यामुळे उद्योग, व्यापार, हॉटेल्सही सुरु करण्यास परवानगी देणेत आली आहे. मात्र मंदिरांना अद्यापही उघडणेची परवानगी दिलेली नाही. 

हुपरीचे ग्रामदैवत श्री अंबाबाई हे देवस्थान जागृत आहे. सद्याचा पवित्र अधिक महिना तसेच भाविकांची कोरोना आजारातून झालेली मुक्तता यामुळे देवी दर्शनाची ओढ लागलेली आहे.

किमान सकाळच्या आरतीपुरते तरी दोन तास मंदिर देवी दर्शनासाठी खुले करावे अशी समस्त नागरीकांची इच्छा आहे.

सदर बाबत कोरोनाबाबतचे सर्व नियम व अटी यांचे भाविक भक्तांकडून पालन होईल अशी आम्हाला खात्री आहे.

तरी श्री अंबाबाई मंदिर अंशतः सुरु करणेत यावे व त्यासाठी हुपरी नगरपरिषद, पोलिस खाते, देवस्थान कमिटी यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करावे असे प्रतिपादन हुपरीचे नगरसेवक गणेश वाईंगडे यानी केले आहे.

वरीलप्रमाणे लेखी निवेदन हुपरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के साहेब यांना देणेत आले.

पोलिस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करणेची ग्वाही दिली.

यावेळी नगरसेवक सुभाष ससे, मराठा समाजाचे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई, उद्योगपती अभयसिंह घोरपडे, जनसेवक मनोज पाटील, सुर्यकांत रावण, युवा नेते सचिन मोहिते आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a comment

0 Comments