कर्मच्यार्यांची संख्या अपुरी.

 हॉटेल व्यावसायिकांची कसरत; कर्म
चाऱ्यांची संख्या अपुरी

PRESS MEDIA :.  पुणे : मोहम्मद जावेद मौला :

पुणे – शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट-बार आजपासून सुरू होणार असले तरीही हॉटेल व्यावसायिकांना धंद्याची मोठी धास्ती किंवा चिंता वाटत आहे. पालिकेने 50 टक्के ग्राहक क्षमतेवरच हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यात, प्रति हॉटेल केवळ 20 टक्के ग्राहकच डाइन इनचा लाभ घेतील.या सह सुरक्षिततेचे नियमही बंधनकारक असून कारवाईचाही इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

महापालिकेकडून परवानगी मिळालेली असली तरी करोनाच्या काळात पुणे सोडून त्यांच्या मूळ गावी गेलेले कर्मचारी पुण्यातील करोनाच्या स्थितीमुळे येण्यास तयार नाहीत, त्यामुळे हॉटेल व्यवसाय म्हणजे आधी हाताला चटके… असा अनुभव देणारा ठरत असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

हॉटेल व्यावसायिक सौरभ अमराळे यांनी सद्यस्थितीबाबत भाष्य करताना सांगितले की, हॉटेल अनलॉक होत असली तरी ग्राहकांकडून किती प्रतिसाद मिळेल, याबाबत साशंकता असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत. माझ्या हॉटेलात 70 कर्मचारी काम करतात, त्यापैकी आजपासून 14 ते 15 कर्मचारीच कामावर येतील. कूक अभावी अनेक हॉटेलांमधील मेनूही बदलले जातील, असेही अमराळे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post