स्थलांतरला विरोध


नायडू हॉस्पिटल स्थलांतरला विरोध

PRESS MEDIA LIVE : पुणे :

 

एकशे वीस वर्षाचा असलेल्या नायडू हॉस्पिटल  स्थलांतर करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला.रुग्णालयाच्या जागेवर वैद्यकीय महाविद्यालय होणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमातून पुढे आली आहे.तो तसा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतल्याची माहिती समोर येत आहे.

एकशे वीस वर्षाचा असलेल्या नायडू हॉस्पिटल मुख्य शहरी भागात असलेल्या नायडू हॉस्पिटल शहरापासून लांब बाणेर ला हलविण्याचे निर्णयाला आज रोजी 14 Oct 2020 रोजी नायडू हॉस्पिटल बचाव कृती समितीच्या वतीने पुणे महानगरपालिका मुख्य द्वारासमोर आंदोलन करून स्थलांतर निर्णयाला विरोध करण्यात आले.

मुख्य शहरात असलेल्या पुणे स्टेशन जवळ हॉस्पिटल साधारणतः दोनशे पेक्षा जास्त अधिक झोपडपट्टीधारकांना गोरगरिबांना त्याचा फायदा होत होता. एखादा माणूस आजारी पडला तर सहज नायडू हॉस्पिटल पर्यंत पोहोचण्याची त्याला सोयी सुविधा होती. मात्र बाणेर या ठिकाणी हॉस्पिटलला हलविण्याचा निर्णय मुळे पुणे शहरातील गोरगरीब लोकांचे प्रचंड हाल होणार व प्रवासाचे भाडे सुद्धा लोकांना परवडणार नाही.

नायडू हॉस्पिटलच्या मोठ्या जागेवर वैद्यकीय महाविद्यालये जरूर उभारा मात्र नायडू हॉस्पिटल आहे त्याच ठिकाणी त्याला राहू द्या नायडू हॉस्पिटल ला स्थलांतर करू नका. अशी मागणी आज नायडू हॉस्पिटल बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आली.

त्याबाबतचे निवेदन पुणे महानगरपालिका आयुक्त मा आयुक्त विक्रम कुमार पुणे महानगरपालिका आयुक्त.यांना निवेदन सादर केले. 

साबीर शेख तोपखाना यांच्या नेतृत्वाखाली नायडू हॉस्पिटल बचाव कृती समितीत सामील असलेल्या मूलनिवासी मुस्लिम मंच, एम. सोशल क्लब, भारतीय एकता महामोर्चा,न्यू तिरंगा फाउंडेशन, क्रिश्चन चारीटेबल ट्रस्ट, मानवी हक्क सुरक्षा महासंघ,भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पक्ष,येरोडा फाउंडेशन,सामाजिक परिवर्तन संस्था,जनता संघर्ष दल,नूरानी फाउंडेशन, ओलुसा फाउंडेशन

इत्यादी संघटनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालिकेसमोर निदर्शने केली व निवेदन सादर केले.

Post a comment

0 Comments