AdSense code कोरोनाच्या पार्श्वभूमीवर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवात मंदिरे बंदच राहणार

PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर : 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नवरात्रौत्सवात करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे मंदिर, नृसिंहवाडी, श्री जोतिबा यासह सर्वच मंदिरे नवरात्रौत्सवातही दर्शनासाठी बंदच राहणार आहेत. याबाबत कोणताही निर्णय अद्याप राज्य शासनाने घेतलेला नाही. त्यामुळे सध्या तरी बंद मंदिरात नवरात्रौत्सवाचे पारंपरिक व धार्मिक विधी प्रथेप्रमाणे आयोजित करण्यात येणार आहेत. शासनाच्या सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करून हे सर्व पारंपरिक विधी होतील. प्रतिवर्षा प्रमाणे जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विविध विभागांनी नवरात्रौत्सवाचा सोहळा सुरळीत व्हावा, यासाठी सहकार्याचे आवाहन पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षपश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने नवरात्रौत्सवाच्या नियोजनासंदभार्त बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजी पेठेतील देवस्थान समितीच्या मुख्य कार्यालयात बैठक झाली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या सूचना व आवाहनानुसार इतर सणांप्रमाणेच नवरात्रौत्सवही पारंपरिक पद्धतीने गर्दी टाळून साधेपणाने उत्सव साजरा करण्याबाबात यावेळी चर्चा करण्यात आली.

कोरोना संसर्गामुळे मंदिरातील सर्व धार्मिक विधी हे शासनाच्या नियमानुसार करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. नवरात्रौत्सवाच्या काळात रोज होणारी पालखी, तसेच ललित पंचमी आणि दसरा सोहळा यासाठी शासनाच्या नियमानुसार व अटींची पूर्तता करून सर्व धार्मिक विधी करण्यात येणार असल्याचे महेश जाधव यांनी सांगितले.

बैठकीस जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव, वाहतूक निरीक्षक वसंत बाबर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, देवस्थानचे सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, उपसचिव शीतल इंगवले, अभियंता सुदेश देशपांडे, सुयश पाटील, मंदिर व्यवस्थापक धनाजी जाधव, मिलिंद घेवारी यांच्यासह श्रीपूजक मंडळ, व्हाईट आर्मी, अनिरुद्ध उपासना केंद्र, पोलिस प्रशासन, वीज मंडळ, महानगरपालिका इस्टेट विभाग, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, दूरसंचार, नवरात्रात वेगवेगळ्या सेवा देणारे सेवेकरी, सुरक्षा पुरवणार्‍या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महेश जाधव यांनी केले.

Post a comment

0 Comments