पुणे : युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर खून प्रकरण

युवा सेनेचे पदाधिकारी दिपक मारटकर यांचे खून प्रकरणात कुख्यात गुंड बापू नायर याच्या सांगण्यावरून झाल्याचे निष्पन्न 

6 पोलीस निलंबित 


PRESS MEDIA LIVE : पुणे :

पुणे : – पुण्यातील गाजलेल्या युवा सेनेचा पदाधिकारी दिपक मारटकर यांचा खून प्रकरणात कुविख्यात गुंड बापू नायर याच्या सांगण्यावरून खून केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर आता याच प्रकरणात पुणे पोलीस दलातील 6 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. बुधवारी निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्यांची नावे आणि निलंबनाची माहिती बाहेर पडू नये यासाठी खास ‘मेहनत’ घेतली जात होती.

याप्रकरणात कोर्ट कंपनीमधील पोलीस हवालदार सुभाष ननावरे, कर्मचारी सुधीर कुठवड, सूर्यकांत मानकुमरे, रोहित ओव्हळ, भीमाशंकर ठाणेदार, संजय चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे.

सुभाष ननावरे हे पोलीस हवालदार असून, लोहमार्ग पोलीस दलातून ते पुण्यात बदलून आले आहेत. तर इतर पोलीस कर्मचारी 2016 बॅचचे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, युवा सेनेचा पदाधिकारी दीपक मारटकर यांचा 10 जणांनी कोयत्याने सपासप वारकरून निर्घृण खून केला होता. काही दिवसांत पुणे पोलिसांनी याप्रकरणी 10 जणांना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर कुविख्यात गुंड बापू नायर याच्या सांगण्यावरून खून झाल्याचे समोर आले होते. या खुनातील आरोपी हे बापू नायर याला ससून रुग्णालयात भेटल्याचे समोर आले होते. बापू नायर सध्या कारागृहात आहे. उपचारासाठी तो ससून रुग्णालयात आला होता. त्यावेळी या आरोपींनी त्याची भेट घेतली होती. त्यानंतर हे खुनाचा प्रकार घडला.

Post a Comment

Previous Post Next Post