बेडकिहाळ : बेडकिहाळ चा ऐतिहासिक दसरा बेडकिहाळ चा ऐतिहासिक दसरा व पालखी सोहळा भक्तिमय वातावरणामध्ये  पार पडला..

PRESS MEDIA LIVE : बेडकिहाळ : विक्रा शिंगाडे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :

     बेडकिहाळ चा दसरा म्हनजे कर्नाटकात दुसर्या नंबरचा महोत्सव म्हनुन मानला जातो. पण कोरोनासारख्या महाभयंकर सांसर्गिक रोग असल्यामुळे हा दसरा अंत्यत साध्या पध्दतीने सरकारांचे नियम पाळुन बेडकिहाळ मधील सर्व  नागरिकांनी भक्तीमय वातावरणात व उत्साहात सर्व विधी पार पाडल्या. श्री सिद्धेश्वर दसरा कमिटी यांनी घालून दिलेल्या नियमाप्रमाणे सर्व भक्तांनी व नागरिकांनी याचे पालन करुन कोरोनासारखा महाभयंकर सांसर्गिक रोग पसरनार नाही याची दक्षता घेत कोणालाही कोरोनाचा बाधा होऊ नये म्हणून सदलगा पोलिस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी व फौजदार तसेच सदलगा पोलिस स्टेशनचे पी.एस.आय.आर.वाय.बीळगी यांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

 सालाबादप्रमाणे श्रींच्या पालखीची संपुर्ण  गावातुन ढोल, ताशा,सनयी, चौधडा, करडोंलच्या  गजरात  ग्राम दैवत श्री कल्याण सिध्देश्वर चा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. दुपारी २ वा. श्री सिद्धेश्वर मंदिरातुन पालखीची मिरवणूकीस सुरवात करण्यात आली. त्यावेळेला मंदिर कमिटी, दसरा कमिटी, व पालखी कमिटी  यांचें सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. बेडकिहाळ ग्राम पंचायतीकडुन पालखी च्या सुरक्षिततेसाठी व गर्दी होऊ नये म्हणून पालखीच्या दोन्ही बाजूला दोरी लाऊन अंतर ठेवन्यात आला होता. पालखी धरन्यासाठी सर्व भक्तांनी मास्क लावून पोलीसांनी दिलेल्या नियमानुसार सुरक्षित अंतर ठेऊन हा पालखी सोहळा दिमाखात पार पडला. 

  श्री सिद्धेश्वर च्या पालखीला अनेक भक्तांनी नैवैद्य दाखवुन आशिर्वाद घेतला. रात्री ८ वाजुन ३० मिनीटानंतर श्रींची पालखी ईनामदार वाढ्यात दाखल झाली. त्यानंतर रात्री १२ वा. वाढ्यामध्ये कुलकर्णी व इनामदार यांच्या परिवाराकडून आरती व महापुजा करुन परत श्रींची पालखी गावातुन ढोल, ताश्यांच्या गजरामध्यें पहाटे ५ वा. तुळजा कट्यांवर पालखींचे आगमन झाले. त्यानंतर श्रींची पालखी मंदिरात पोहचली.  मंदिरामध्ये प्रदक्षिना  घालून मानकर्यांना श्रीफळ व साखर देऊन दसरा पालखी सोहळा ची सांगता भक्तीमय वातावरणात करण्यात आली.

Post a comment

0 Comments