पुणे : समर्थ भारत अभियान

 आबेदा इनामदार महाविद्यालयात 'सतर्क भारत,समर्थ भारत' अभियान

PRESS MEDIA LIVE :पुणे  :

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एन एस एस ) युनिट तर्फे 'सतर्क भारत,समर्थ भारत' अभियान आयोजित करण्यात आले आहे.२७ ऑकटोबर ते २ नोव्हेंबर या काळात या अभियानांतर्गत विविध कार्यक्रम  आयोजित करण्यात आले आहेत. २७ ऑकटोबर रोजी प्राचार्य डॉ शैला बुटवाला यांच्या उपस्थितीत आझम कॅम्पस येथे सत्यनिष्ठेची शपथ घेण्यात आली. डॉ राहुल मोरे,डॉ गौरी देवस्थळे,डॉ एम जी मुल्ला,प्रा निकिता पांढरे  उपस्थित होते. भ्रष्टाचार निर्मूलन विषयावर वेबिनार,वाद विवाद स्पर्धा,प्रश्न मंजुषा,आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

Post a comment

0 Comments