महावितरण कडून शॉक च


महावितरण कडून शॉकच बसतच आहे

इचलकरंजीत वीज बिलांच्या समस्यांबाबत तक्रारीची ओघ कायम.


PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : मनु फरास :


इचलकरंजी : वीजबिलाची आकारणी, मीटर रीडिंगच्या अडचणी, चुकीची बिले, स्थिर आकार असे अनेक मुद्दे वीज ग्राहकांसाठी अधिक अडचणीचे ठरले आहेत. आता ऑगस्ट-सप्टेंबरच्या वीजबिलांपासून स्थिर आकाराची दर आकारणी केलेली वीजबिले ग्राहकांना वाटप झाली आहेत. सध्या वीजबिलांचा घोळ समजेना, अशी स्थिती ग्राहकांत आहे. अनलॉकमध्ये ग्राहकांना वीजबिलाबाबत आवश्‍यक सुविधा देण्याचा प्रयत्न "महावितरण'ने सुरू केला असला तरी वीजबिलांच्या समस्यांबाबत तक्रारींचा ओघ कायम आहे.

वीजबिलामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र होरपळला आहे. लॉकडाउन सुरू होताच एप्रिलमध्ये नियमित वीज दरवाढ लागू केली. कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या ग्राहकांना या वाढीव दराचा जोरदार फटका बसला."महावितरण'ने स्थिर आकार लॉकडाउन कालावधीत माफ केला होता. मात्र, या काळात रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गापासूून वाचण्यासाठी मीटर रीडिंगचे काम बंद ठेवले होते.

रीडिंगऐवजी सरासरी बिले आकारली गेली. सरासरी बिले जादा रकमेची बिले याबाबत ग्राहकांनी आक्षेप घेतल्याने सदोष मीटर बदलून देण्याची मागणी वाढली होती. सध्या तक्रार करणाऱ्या ग्राहकांची वीजबिले तत्काळ तपासून देण्याचे कामही सुरूच आहे. घरगुती ग्राहकांच्या अडचणीबरोबर उद्योजकांच्या वीजबिलाचा प्रश्‍न आता धोरणात्मक झाल्याने याबाबत शासनाकडून निर्णय घेतला जावा, असे प्रयत्न सुरू झाले आहेत. प्रत्यक्षात उद्योग बंद असताना वाढीव बिले भरण्यास उद्योजकांमध्ये नाराजी आहे. सध्या "महावितरण'ने घेतलेल्या भूमिकेने ग्राहकांत अडचणीत अधिकची भर पडली आहे. लॉकडाउन कालावधीत विविध समस्यांनी ग्रासलेल्या नागरिकांना "महावितरण'कडून शॉक बसतच आहे.


नेमके असे झाले

- लॉकडाउनच्या सुरवातीला वीज दरवाढ लागू

- कोरोनामुळे मीटर रीडिंग थांबले

- सरासरी बिलांची रक्कम ग्राहकांना ओझे

- स्थिर आकाराची रक्कम सुरवातीला वगळली

- ऑगस्टच्या बिलापासून स्थिर आकारसह वाढीव बिलाचे वाटप

चुका सुधारणा करून देत आहोत

वीजबिलात काही चुका असतील तर सुधारणा करून देत आहोत. ग्राहकांच्या अडचणी दूर करण्याबाबत कार्यवाही केली जात आहे. वीजबिलांचे काही निर्णय धोरणात्मक असल्याने याचा निर्णय राज्य शासन करेल.

- सोमाण्णा कोळी, कार्यकारी अभियंता, "महावितरण', इचलकरंजी

Post a Comment

Previous Post Next Post