राज्य सरकार ची नियमावली

 

राज्य सरकारची हॉटेल, रेस्टॉरंट, बार साठी नियमावली.

   PRESS MEDIA LIVE : मुंबई :

मुंबई- तब्बल सहा महिन्यानंतर अनलॉक पाच मध्ये राज्य सरकारने ज्यात हॉटेल, रेस्टॉरंट, बार्स सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील काही नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमांचं पालक करत हॉटेल मालकांना हॉटेल करणल सुरु  करण्याची परवनगी देण्यात आली आहे.

-प्रत्येक ग्राहकाची प्रवेशद्वारावर स्क्रिनिंग होणार. कोणत्याही प्रकारची कोरोनाची लक्षणे आहे का? हे तपासावे. उदा. तापमान, सर्दी, खोकला.लक्षणविरहीत ग्राहकांनाचं केवळ प्रवेश द्यावा.

-हॉटेल, रेस्टारंटमध्ये भेट देणाऱ्या सर्व ग्राहकांची नोंदणी ठेवावी. कोणालाही सेवा देताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.ग्राहकांच्या परवानगीने त्यांची माहिती प्रशासनास पुरवावी. जेणेकरुन कोणत्याही रुग्णाच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा तपास करणे सोपे होईल.

-कोणत्याही ग्राहकाला मास्कशिवाय प्रवेश देऊ नये. केवळ खाण्यासाठी मास्क काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.

-प्रत्येक ग्राहकासाठी हँडसॅनिटायझर्सची सोय करण्यात यावी. -शक्यतोपैसे हे डिजीटल पद्धतीने स्वीकारावे.

-वॉशरुम्स आणि हात धुण्याचा परीसर कायम तपासत राहवे. तिथे सातत्याने स्वच्छता ठेवावी.ग्राहक आणि कर्मचारी यांच्यातील संपर्क कमीत कमी ठेवावा.

-सर्व सीसीटिव्ही कॅमेरे कार्यान्वित असावे.

-मुंबईत हॉटेल- रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर हॉटेल्समध्ये टेबलचं प्री- बुकिंग करणं आवश्यक असेल.

-एका ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एका वेळी हॉटेलमध्ये प्रवास करु शकणार नाही.

-दोन टेबलमध्ये सुरक्षित फुटांचे अंतर असणे गरजेचे.

-वेळोवेळी टेबल आणि हॉटेलच्या किचनची स्वच्छता होणे आवश्यक असेल.

-हॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोविडची चाचणी करणे आवश्यक असेल.

-मुंबईत हॉटेल-रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर टेबलचं प्री-बुकींग आवश्यक; महापालिकेची नियमावली जारी

Post a comment

0 Comments