लेटेस्ट : हुपरीतील राजकारण

 हुपरीतील  राजकारण

हुपरी मध्ये अंबाबाई मंदिरामध्ये नागरीकांना प्रवेश बंदी.

 फक्त उद्योगपतीनाच दर्शन घेण्यास परवानगी.


PRESS MEDIA LIVE : हुपरी : 

हुपरी येथील अंबाबाई मंदिरामध्ये  दसरा नवरात्रौत्सवामध्ये प्रशासनाकडून नागरीकांना मंदिर प्रवेश नाकारण्यात आलेला आहे.नागरिक या निर्णयाचे पालन करीत आहेत. मात्र अंबाबाई मंदिराचे पुजारी राजू गुरव हे या नियमाचे उल्लंघन करुन खास श्रीमंत चांदी उद्योजक यांना खुलेआम दर्शनासाठी परवाणगी देत आहेत.

देवीच्या दसरा उत्सवातील नित्य आरती करणाऱ्या मानकरी बलूतेदार यांच्याबाबतही मोठे राजकारण केले आहे.आपल्या बगलेतील खास माणसांनाच आरतीसाठी मंदिर प्रवेश दिला जात आहे. राजू गुरव याचे खेकटीबाज कारनामे हुपरीकरांना नविन नाहीत. सेवेकरी बलूतेदार भाविकांचाही गुरवांकडून सातत्याने अपमान होत असतो.

राजू गुरवला राजकीय पाठबळ मिळत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे नागरीक त्रस्त झाले असून पैसेवाले उद्योजक  खुलेआम देवीचे दर्शन घेतात आणि सामान्य भाविक निदान कळस तरी दिसू दे म्हणून मुजोर राजू गुरवकडे विनवण्या करीत असतात असे चित्र दिसत आहे.

Post a comment

0 Comments