ब्रेकिंग : राज की बात



एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष प्रवेशाची राज की बात

केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांचे भाष्य.

PRESS MEDIA LIVE :  बारामती :

बारामती : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांच्या बहुचर्चित राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशावर बुधवारी अधिकृत शिक्कामोर्तब झाले. भाजपला रामराम केल्यानंतर राजकीय वर्तुळात त्याचे बराच वेळ पडसाद उमटत आहे. यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे नेतेमंडळी आघाडीवर आहे. त्यात आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भर पडली आहे. त्यांनी एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिट्ठी का दिली यावर भाष्य करतानाच त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामागची 'राज की बात' देखील सांगितली आहे. केंद्रीयमंत्री आठवले यांनी गुरुवारी( दि. २२) बारामती तालुक्यातील कऱ्हा वागज गावामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाचा पाहणी दौरा केला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.यावेळी त्यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.

आठवले म्हणाले, एकनाथ खडसे यांच्याकडे सध्या आमदारकी नसल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहेत. तेथे त्यांना आमदारकीसह मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. त्यांनी राष्ट्रवादीमध्ये न जाता आरपीआयमध्ये यावे अशी अपेक्षा होती. मात्र,ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. तसेच खडसे यांच्याबरोबर भाजपचे १५,१६ आमदार जातील ,असे वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पाहणी दौऱ्यावेळी आठवले यांनी पुरग्रस्तांना राज्य सरकाने तातडीने मदत करण्याची गरज व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केंद्राकडुन मदतीसाठी पत्र लीहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडवणीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह आपण केंद्राकडुन मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे आठवले म्हणाले.

राज्यात सोलापूर, सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये मदत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्राची मदत मिळवू. मात्र, राज्य सरकारची मोठी जबाबदारी आहे. राज्य सरकारने यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. प्रचंड पावसाने कऱ्हा वागज येथील नदीवरील पूल वाहून गेला आहे. पावसाचे पाणी दलितवस्तीमध्ये घुसल्याने नुकसान झाले. त्याचे लवकरात लवकर पंचनामे होणे आवश्यक आहे.

Post a Comment

Previous Post Next Post