अन्यथा आंदोलन.


 आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करा अन्यथा आंदोलन, शिवसेनेचा इशारा

PRESS MEDIA LIVE :  सिंधुदुर्गनगरी  प्रतिनिधी :


आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी कमी प्रस्ताव प्राप्त झाले व प्राप्त झालेले शिक्षकांचे प्रस्ताव स्पर्धात्मक नाहीत ,असे म्हणणे म्हणजे समस्त शिक्षक वर्गाला अकार्यक्षम ठरवून त्यांचा अवमान करणारे आहे.तसेच राज्यातील कार्यरत  आघाडी सरकारला बदनाम करण्याचा जिल्हा परिषद अध्यक्षांचा डाव दिसून येत आहे. तरी 15 ऑक्टोबर पर्यंत आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित न झाल्यास शिवसेना पक्षाच्यावतीने शिक्षकां समवेत तीव्र आंदोलन छेडले जाईल .असा इशारा जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.


सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून (सन १९९२ पासून) महाराष्ट्र शासनाच्या मार्फत व जि. प. सिंधुदुर्गच्या माध्यमातून शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी  ०५ सप्टेंबर रोजी आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण होत आलेले आहे. असे असताना  यावर्षी प्रस्ताव कमी व स्पर्धात्मक नाहीत  असे कारण पुढे करत  पुरस्कार रद्द करणे शिक्षकांवर अन्याय करणारे आहे  याबाबत आज   जि प सदस्य  संजय पडते , नरेंद्र  परब , अमरसेन सावंत , स्वरूपा विखाळे   यांनी निवेदनाद्वारे  मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ हेमंत वसेकर  यांचे लक्ष वेधले आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख महाराष्ट्र राज्यात नेहमीच चढता राहीलेला आहे.विद्यार्थ्यांबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हयातील शिक्षक प्रामाणिकपणे अथक परिश्रम व मेहनत घेत आहेत.

आहेत. त्यामुळेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये १० वी व १२ वीच्या परीक्षेत राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी हे विशेष गुणवत्ता यादीत आलेले आहेत व या सर्व यशाचे श्रेय शिक्षकांना जात आहे हे विसरुन चालणार नाही.

असे असताना आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडे संपूर्ण जिल्ह्यातून १८ शिक्षकांचे प्रस्ताव आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी प्राप्त असून त्यांच्या दिनांक ३० जुलै २०२० रोजी मुलाखती होऊन त्याबाबतचा अहवाल निवड समितीकडे पाठविण्यात आला होता. असे असताना २२ सप्टेंबर २०२० च्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये  जिल्हा परिषद अध्यक्षा यांनी या वर्षी शिक्षकांचे प्रस्ताव कमी आलेत व ते स्पर्धात्मक नाहीत असे कारण सांगून या वर्षीचे पुरस्कार रद्द केल्याचे सांगितले.

प्राप्त झालेल्या प्रस्तावांपैकी मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि. प. सिधुदुर्ग यांचेकडील १९ जून २०२० च्या पत्रातील निर्देशाप्रमाणे प्रत्येक तालुक्यामधून दोन प्रस्ताव जिल्हा स्तरावर पाठवावयाचे आहेत. म्हणजेच जि. प. अध्यक्षा यांचे कमी प्रस्ताव प्राप्त झाल्याचे म्हणणे निराधार व दिशाभूल करणारे आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असताना शिक्षकांचे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठीचे प्रस्ताव स्पर्धात्मक नाहीत असे म्हणणे म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त शिक्षक वर्गाला अकार्यक्षम ठरवून त्यांचा अपमान करणारे व त्यांच्यावर अन्याय करणारे आहे.

सद्या महाराष्ट्र राज्यामध्ये मा. मुख्यमंत्री, ना. श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कार्यरत असल्यामुळे त्या सरकारला बदनाम करण्याच्या उद्देशाने आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द करुन सरकारची शिक्षक वर्गामध्ये बदनामीकरण्याचा जिल्हा परिषद अध्यक्षांचा डाव दिसून येत आहे.

तरी याबाबत  प्राधान्याने लक्ष घालून लवकरात लवकर संबंधीत पुरस्कार वितरणाची कार्यवाही करावी,   १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत सदरील आदर्श शिक्षक पुरस्कार घोषीत न झाल्यास शिवसेना पक्षाच्यावतीने शिक्षकांसहीत तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे तसेच शिवसेना पक्ष  जिल्ह्यातील शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे नमूद केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post