ऑनलाइन शिक्षक दिननूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, इंद्रायणी विद्या मंदिर ,प्रतिभा कॉलेज तर्फे ऑन लाईन शिक्षक दिन                                                                                                                              शिक्षक दिन हा भारत उभारणी दिन  म्हणून साजरा व्हावा :डॉ रघुनाथ माशेलकर       
राष्ट्र उभारणीचे काम शिक्षक करतात : डॉ . माशेलकर                                    
 
PRESS MEDIA LIVE : पुणे :             

'राष्ट्र उभारणीचे काम शिक्षक करतात त्यामुळे शिक्षक दिन हा भारत उभारणी दिन म्हणून साजरा केला पाहिजे ',असे प्रतिपादन डॉ रघुनाथ माशेलकर यांनी केले. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ , इंद्रायणी विद्या मंदिर संस्था ,प्रतिभा कॉलेज आणि  शैक्षणिक संस्थांतर्फे शिक्षक दिन ऑन लाईन साजरा करण्यात आला. त्यावेळीज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी मार्गदर्शन केले.

  संयोजक शैलेश शहा यांनी स्वागत केले. संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे ,दीपक शहा यांच्यासह शिक्षक वर्ग ,विद्यार्थी ,अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हंणून  पुण्यभूषण फौंडेशन चे अध्यक्ष डॉ सतीश देसाई ,लायन्स क्लब चे माजी प्रांतपाल राज मुछाल उपस्थित होते . रामदास काकडे यांनी प्रास्ताविक केले. 

डॉ माशेलकर म्हणाले ,'आयुष्यात चांगले मार्गदर्शन शिक्षणातून ,शिक्षकांकडून मिळते. मार्गदर्शन मिळाले तरी चांगली संधी मिळाली पाहिजे. माणूस घडविणारे शिक्षण हेच योग्य शिक्षण आहे . ज्ञान ,व्यक्ती ,विचार ,क्षमता ,नेतृत्व ,मूल्य संवर्धन करण्याचे काम शिक्षणाने  केल्याने विज्ञार्थी घडत असतो . 'घोका आणि ओका ' पद्धतीने जाता कामा नये. 

जटील प्रश्न सोडविण्याची  तयारी ,चिकित्सक बुद्धी ,नवसर्जन शिलता ,सांघिक कामाची तयारी ही कौशल्ये जीवनात असली पाहिजे .कोविड साथी  मुळे वेगाने बदल झाले आहेत . डिजिटायझेशन ,टेली मेडिसिन ,ई -कॉमर्स जे १० वर्षात झाले नाहीत ,ते एका वर्षात झाले. मात्र ,गरीब व्यक्ती अति गरीब झाल्या ,आव्हाने वाढली. सायबर स्पेस मध्ये शिक्षण देणे हे मोठे आव्हान झाले आहे.त्याचे प्रशिक्षण झाले पाहिजे . डिजिटल लर्निंग  खेड्या पाड्यात पोचले पाहिजे.अन्नदान इतके डिजिटल दान देणे महत्वाचे झाले पाहिजे . सोशल डिस्टनसिंग मुळे सोशल बॉण्डिंग कमी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे,असेही डॉ माशेलकर यांनी सांगितले . 

डॉ माशेलकर पुढे म्हणाले ,'आत्मनिर्भर भारत घडविताना आत्म विश्वास वाढविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. सत्या नडेला ,सुंदर पिचाई देखील  भारतीय शिक्षण पद्धतीतून घडले पाहिजेत,असेही डॉ माशेलकर यांनी सांगितले. सर्व चांगली कामे करताना घरच्यानाही वेळ द्यायचा असेल तर वेळेचे उत्तम व्यवस्थापन करता आले पाहिजे. 

विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रश्नांनाही डॉ रघुनाथ माशेलकर यांनी  समर्पक उत्तरे दिली.१००० शिक्षकांनी ऑन लाईन उपस्थित राहून हा शिक्षक दिन साजरा केला                                                                                  

*D

Post a comment

0 Comments