कॅबिनेट चा शपथविधी


लायन्स क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री यांच्या कॅबिनेटचा शपथविधी                                                                                                                    समाजकार्याकडे भक्ती म्हणून पहा : अभय शास्त्री 

PRESS MEDIA LIVE :. पुणेः

लायन्स क्लब ३२३४- डी २ चे  प्रांतपाल सीए अभय शास्त्री यांच्या कॅबिनेटचा शपथविधी समारंभ(इन्स्टॉलेशन) धृव ग्लोबल स्कूल,पुणे येथे झाला.प्रथम उपप्रांतपाल हेमंत नाईक,द्वितीय उपप्रांतपाल राजेश कोठावदे यांच्यासह कॅबिनेट मधील ३०० सदस्यांचा शपथविधी पार पडला.  

  शपथविधी कार्यक्रमाचे संयोजन मल्टिपल कॉन्सिल चेअरपर्सन गिरीश मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली झाले.कार्यक्रमाचे उद्घाटन लायन्स क्लब इंटरनॅशनलचे आंतरराष्ट्रीय प्रथम उपाध्यक्ष अलेक्झांडर डग्लस यांच्या हस्ते झाले.तसेच कॅबिनेटचे इन्स्टॉलेशन माजी आंतरराष्ट्रीय संचालक  नरेंद्र भंडारी यांनी केले.ग्लोबल ॲक्शन टीम को-अॉर्डिनेटर काझीत हबानंदानी हे प्रमुख वक्ते होते.  मल्टिपल जीएसटी को-अॉर्डिनेटर राजेंद्र मुछाल,माजी प्रांतपाल जितेंद्र मेहता, प्रांतपाल अभय शास्त्री यांच्या पत्नी सौ. अनुराधा शास्त्री, प्रांतसचिव परमानंद शर्मा,डिस्ट्रिक्ट कॅबिनेटचे सदस्य, रिजन चेअरपर्सन्स,झोन चेअरपर्सन्स कार्यक्रमाला उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन को-अॉर्डिनेटर विजय सारडा जीएसटी को-अॉर्डिनेटर सुनिता चिटणीस, रीजन चेअरपर्सन पुनीत कोठारी यांनी केले. उपस्थितांचे स्वागत करताना त्यांना तुळशीचे बीज देऊन'सो सर्व्हिस सीड्स ' (Sow Service Seeds) ही  प्रांतपालांची संकल्पना सांगण्यात आली.या कार्यक्रमाला झूम वरून पाचशेहून अधिक लोकांनी उपस्थिती लावली. 

'लायन्स क्लब मधून सेवेची बीजे समाजात रुजावी आणि सेवाभावनेचा वटवृक्ष व्हावा.हे सेवाकार्य भक्ती समजून करावे म्हणजे त्यात समर्पित भावना येईल,' असे प्रतिपादन अभय शास्त्री यांनी यावेळी केले.लायन्स क्लब ३२३४- डी २ हा प्रांत पुणे,पिंपरी -चिंचवड,नगर,नासिक या विभागांचा मिळून बनलेला असून त्यात १३५ हुन अधिक क्लब आहेत.सदस्य संख्या ७ हजाराहून अधिक आहे,अशी माहितीही त्यांनी दिली.कोरोना विषाणू साथीमध्ये लायन्सने केलेल्या सेवाकार्याची माहिती यावेळी देण्यात आली. 
--------------                                                                                                      

Post a Comment

Previous Post Next Post