कोरोना विषयक जनजागृती.


 'सिंचन भवन' येथे कोरोना विषयक जनजागृती                         

 सिंचन भवन' येथे 'कोरोना किलर ' यंत्रणा                                                                                         कोरोना किलर ' मुळे निर्धोक कामकाज शक्य : हेमंत धुमाळ                                                                                                          

PRESS MEDIA LIVE :  पुणे :


शंभर टक्के उपस्थितीत कार्यालयीन सुरु असणाऱ्या सिंचन भवन पुणे येथे कोरोना पासून सुरक्षेसाठी जनजागृती करण्यात आली तसेच 'कोरोना किलर' ही इलेक्ट्रोनिक  यंत्रणा बसविण्यात आली. अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी ही माहिती दिली. कार्यालयीन प्रवेशापूर्वी टेम्परेचर गन ने तपासणी,सॅनिटायझर,मास्क चा वापर आणि कार्यालयात कोरोना किलर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बसविण्यात आली आहेत.   

'कोरोना विषाणू साथीपासून सरकारी कामकाज थांबू नये म्हणून कोरोना विषाणू पासून सुरक्षित राहण्यासाठी सर्व ती काळजी घेतली जात आहे. आयनायझेशनच्या माध्यमातून  भोवतालचे वातावरण कोरोना मुक्त करणारे 'कोरोना किलर ' उपकरण बसविण्यात आले आहे.या सर्व उपाय योजनांमुळे कर्मचाऱ्यांना निर्धोक पणे काम करणे शक्य झाले आहे ',असे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांनी सांगितले. 

हेमंत धुमाळ  यांच्या हस्ते 'कोरोना किलर ' यंत्रणेचे  उदघाटन करण्यात आले.पुण्यातील  इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रा ली चे संस्थापक भाऊसाहेब जंजिरे यांनी  'कोरोना किलर ' संशोधनाची माहिती दिली. 

कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण मास्क लावणे, आसपासच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करणे हे उपाय करतो.परंतू ,असंख्य वस्तूंचे निर्जंतुकीकरण मात्र करू शकत नाही. नेमक्या याच अडचणीवर मात करुन आपले घर किंवा कामाचे ठिकाण कोरोना व्हायरसमुक्त करण्याची क्षमता असलेले तंत्रज्ञान  व मशीन  इलेक्ट्रोनिक इंजिनियर असलेल्या आणि  इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे संस्थापक असलेल्या भाऊसाहेब जंजिरे यांनी संशोधित केले. आय. सी. एम.आर. (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) एन. आय. व्ही. (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) तसेच महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण  व संशोधन विभागाने ह्या  मशीनची कार्यक्षमता चाचणी प्रमाणित केली आहे . 

 व्यवसायाच्या ठिकाणी हे मशीन बसविता येते. ज्या ठिकाणी हे मशीन बसविण्यात येते तेथील थोडी हवा ही मशीन घेते आणि त्या हवेचे आयोनायझेशन करून पुन्हा त्या भागातील संपूर्ण  हवेत सोडते. ज्या ज्या ठिकाणी ही  हवा पोहोचते  तेथे हे आयन पोहचतात व  कोरोना व्हायरस आणि  इतर विषाणू तसेच अपायकारक सूक्ष्मजीव नष्ट व निष्प्रभ होतात, असे भाऊसाहेब जंजिरे यांनी सांगीतले.आयसीएमआर ,राष्ट्रीय विषाणु संशोधन संस्था ,नायडू हॉस्पिटल यांनी 'कोरोना किलर ' विषाणू नाशक   इलेक्ट्रॉनिक उपकरणाला दिलेली  कार्यक्षमता  चाचणी प्रमाणपत्र यावेळी   देण्यात आली .  अशा स्वरूपाची प्रमाणपत्र  मिळवणारे हे पहिले उपकरण आहे ,असे भाऊसाहेब जंजिरे यांनी यावेळी सांगितले. 

  'कोरोना किलर ' हे फक्त विजेवर चालणारे आणि साबण किंवा सॅनिटायझर न लागणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे . ते कोणत्याही बंद परिसरात वापरता येते . घर ,हॉस्पिटल ,शाळा ,हॉस्पिटल ,गाड्या ,विमान, प्रयोगशाळा ,क्वारंटाईन सेंटर ,कारखाने ,मंदिरे अशा कोणत्याही ठिकाण ते वापरता येते .  रुग्णाचे मास्क ,हातमोजे ,बेडशीट आणि इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यास देखील हे उपकरण उपयोगी ठरते. 

 उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या जनता दरबार दालनातही हे मशीन बसविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अनेक संस्था, साखर आयुक्तालय, शासकीय कार्यालये, देवस्थाने आणि निवासाच्या ठिकाणीही हे मशीन यापूर्वीच  या संस्थेने बसविले आहे,उप मुख्य मंत्री अजित पवार,उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनाही या संशोधनाचे सादरीकरण करण्यात आलेले आहे तसेच अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते  या उपकरणाचे मुंबई येथे  लोकार्पण करण्यात आले,अशी माहिती यावेळी देण्यात आली .                                                                                                .                                                                  

Post a comment

0 Comments