रोटरी क्लब ऑफ पुणे


रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज आयोजित'

'

गणेशमुर्ती निर्मिती' स्पर्धेचे पारितोषिक वितरण

PRESS MEDIA LIVE : पुणे :

'रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज' द्वारे आयोजित 'गणेश मुर्ती निर्मिती' स्पर्धेमध्ये अवनी वडपल्लीचा प्रथम क्रमांक आला,ओम भावसारचा द्वितीय क्रमांक आला.या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला.

गणेशोत्सव कालावधीत झालेल्या  स्पर्धेमध्ये पुणे,पिंपरी चिंचवड विभागातील ५२ शाळकरी मुलांनी  घरी उपलब्ध असलेल्या सामुग्रींपासून आकर्षक गणेश मुर्ती बनविल्या.ऑन लाईन कार्यक्रमातून पारितोषिक वितरण करण्यात आले.

प्रमुख पाहुणे रोटरीयन अनिल जाधव,'रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज'चे अध्यक्ष भरत चव्हाण-पाटील, सचिव डॉ. सिमरन जेठवानी,पल्लवी साबळे,सुहास डगळे,पंकज ढगे यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन करुन कोवीड साथीच्या दरम्यानच्या काळात आयोजित केलेल्या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व  स्पर्धकांचे आभार मानले.सहभागी झालेल्या प्रत्येकाला रोख बक्षीसे देण्यात आली. 

Post a comment

0 Comments