टिव्ही 9 चे रिपोर्टर पांडूरंग रायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.


 टीव्ही TV 9 चे रिपोर्टर पांडूरंग रायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली

PRESS MEDIA LIVE : पुणे :

मनमिळावू शांत स्वभावाचा कोणताही विषय असो भरपूर चर्चा करणारा अत्यंत चांगला पत्रकार कोरोना या आजारामुळे तो आपल्यातून निघून गेला . covid-19 कोरोनाचा आजार महामारी असताना पुणे शहरात मार्च,एप्रिल,मे  यादरम्यान अत्यंत कडक लॉकडॉन असताना सतत रस्त्यावर दिसणारा कोरोना विषयी विविध बातम्या कव्हरेज करणारा पांडुरंग रायकर त्यांचा या आजारामुळे निधन झाल्याने अत्यंत दुःख झाले आहे.

परमेश्वर अल्लाह त्यांच्या आत्म्याला शांती द्यावे कुटुंबांचा लोकांना हिम्मत द्यावी ते या दुःखातून सावरावे.

      मला याची चांगली आठवण आहे

त्याकाळात रस्त्यावर फिरणे कठीण होते बघेल त्याठिकाणी चौकाचौकात पोलीस थांबले होते हॉटेल्स चहापाणी रस्त्यावर पाणी सुद्धा भेटत नव्हता. मोजके काही पत्रकार टीव्ही चॅनेल्स वाले रस्त्यावर दिसत होते त्यापैकी एक नाव म्हणजे पांडुरंग रायकर.पुणे शहरात महामारी असताना विविध समस्या माझ्या डोळ्यासमोर दिसत होते आजारी माणसाला हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यासाठी अंबुलन्स ची समस्या असो किंवा पेशंटला ऍडमिट करून घेणे औषध उपचार हॉस्पिटलमधील वाढीव बिल लूटमार पुणे शहर सोडून स्थलांतरित होणारे लोकांची समस्या असो पांडुरंग यांन माहिती मिळताच लगेच धावून येणारा त्या प्रश्नांना आपल्या चैनलच्या माध्यमातून जनतेसमोर आणून प्रश्नांना मार्गी लावणारा राज्यशासनाच्या व पुणे मनपाच्या निर्देशांनात अाणून देणारा एक चांगला पत्रकार आपण सर्वांनी गमावला आहे.

मूलनिवासी मुस्लिम मंचा तर्फे आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत आहोत.

          पत्रकार आपल्या जीवाची बाजी लावून काम करीत असतात त्यांच्या सुरक्षाचा काय ?

कोणत्याही प्रकारचे सुरक्षा पत्रकारांना मिळताना दिसत नाहीत.या माहामारीत काम करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स हॉस्पिटलचे कर्मचारी सरकारी यंत्रणा ग्रामीण भागात काम करणारे लोक या सर्वांविषयी राज्य सरकारने विचार केले आहे . काम करत असताना एखाद्याचा जीव गेल्यास त्याला नुकसान भरपाई देण्यात येते किंवा त्यांच्यासाठी विमा योजना दिलेले आहे.

मात्र सरकारचे डोळे उघडणारे पत्रकार बंधूंचा काय ?

पत्रकारांच्या समस्या बाबत त्यांच्या अडचणी बाबत राज्य सरकारने गांभीर्याने विचार करावा हीच विनंती


मा.अंजुम इनामदर

अध्यक्ष मूलनिवासी मुस्लिम मंच

9028402814

Post a comment

0 Comments