डॉ. जाफर मुल्ला यांचा सन्मान.


 

लॉक डाऊन काळात कोरोनाची  भीती न बाळगता रुग्णांच्या वर उपचार करणारे....

इचलकरंजीतील डॉ. जाफर मुल्ला यांना प्रेस मीडिया गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी ( मनु फरास )

इचलकरंजी : येथील तांबे माळ  परिसरातील डॉक्टर जाफर मुल्ला यांनी  लॉक डाऊन काळात  कोरोनाची भीती  असताना सुद्धा आपल्या जीवाची व आपल्या कुटुंबाची पर्वा न करता येणाऱ्या गरजू रुग्णांची तपासणी करून औषध उपचार सातत्याने करत आहेत. या मुळे रुग्णांना सुद्धा बरे वाटत आहे.

   अशा डॉक्टरांची सर्वांनाच गरज आहे जे देश हितासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता  रुग्णांची सेवा करण्यासाठी  दिवस रात्र  झटत आहेत. त्यांच्या या कामाची दखल घेऊन आम्ही आमच्या प्रेस मीडिया या  वृत्तपत्र परिवार तर्फे त्यांना गौरव पत्र देऊन गौरविण्यात आले.   

 या  वेळी प्रेस मीडिया चे कार्यकारी संपादक लियाकत सर्जेखान , प्रेस मीडिया चे इचलकरंजी प्रमुख प्रतिनिधी मनु फरास, डॉ.जाफर यांच्या पत्नी सौ. करिष्मा मुल्ला , नेमिनात देसाई, सचिन वायकर, भरत शिवलिंगे, संजय नाईकवाडे, ओम यादव, सागर शिवलिंगे, संदीप पुजारी, इलाही नाईकवाडे ,मुबारक कलावंत, नौशाद सावळगी, संभाजी माने व भागातील प्रतिष्ठित नागरिक यांनी डॉक्टर जाफर यांना भेटून त्यांच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले.

Post a comment

0 Comments