जनआंदोलन करण्याचा इशारा..

 महाराष्ट्र सरकारने दशरथ भांडे समितीचा अहवाल केंद्र सरकारला लवकरात लवकर नाही पाठवला तर जनआंदोलन करण्याचा इशारा कोर कमिटीचे सदस्य सागर परीट व जिल्हाध्यक्ष आनंदराव शिंदे यांनी दिला

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : (प्रतिनिधी) :

दि १३/९/२०२० रोजी महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळ शाखा कोल्हापूर च्या वतीने ऑनलाईन मीटिंग आयोजित केली होती. महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाचे विभागीय अध्यक्ष वसंतराव वाठारकर, कोर कमिटीचे सदस्य सागर परीट यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. सभेचे अध्यक्ष श्री आनंदराव शिंदे होते. तर जिल्ह्याचे सचिव अमरसिंह यांनी सभेचा प्रस्ताव मांडला. एक एक विषयावर खुले चर्चा करण्यात आली प्रथम जनगणना विषयावर  विचारविनिमय करण्यात आला. मागील सरकारने 2011 च्या नंतर जनगणना केल्या नसल्याकारणाने आपल्या समाजाचा आकडा आपण या सरकारला देऊ शकत नसल्याने म्हणून महाराष्ट्र राज्य परीट धोबी सेवा मंडळाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जनगणना अभियान राबवण्यात येणार असून त्यासाठी जिल्ह्यातील समाज बांधवांनी आपण कुटूंब प्रमुख म्हणून रजिस्ट्रेशन करून घेणे बंधनकारक आहे. त्याच बरोबर प्रदेश कमिटी जो आदेश देईल किंवा आंदोलनाची दिशा असेल  त्याकरिता 7 लोकांची कमिटी करण्यात आली. त्यामध्ये आनंदराव शिंदे, सागर परीट, वसंतराव वठारकर, सरदार पवार, अमरसिंह शिंदे, अभिजीत परीट, सुनील परीट, संघटक व महिला जिल्हा अध्यक्ष नयना पोलादे यांची निवड करण्यात आली.जनगणना गावापासून ते शहरापर्यंत करण्याचा सर्व कार्यकर्त्यांचा मानस केला आहे. रजिस्ट्रेशन करण्यास काही अडचणी निर्माण झाल्यास कुमारी धनश्री ठाकरे हिच्या बरोबर या विषयावर फोनवरच संपर्क साधने.मागील मीटिंगमध्ये ज्यांची निवड झाली आहे त्यांचे निवडीचे पत्र कोल्हापूर हातकणंगले करवीर व शिरोळ तालुक्यातील हुपरी येथे कार्यक्रम घेऊन देण्यात येणार आहे. त्याचबरोबर गडिंग्लज आजरा चंदगड व गारगोटी या तालुक्यातील निवडीचे पत्र गारगोटी येथे कार्यक्रमांमध्ये देण्यात येणार आहेत. सर्वांच्या मताने विषय घेण्यात आला त्याच बरोबर महाराष्ट्र शासनाने आमच्या हक्काचा एसी चा लढा दशरथ भांडे समितीचा अहवाल केंद्र सरकारला लवकर नाही पाठवला तर वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचे ठरले आहे.

Post a comment

0 Comments