सांगली. सर्वच यंत्रणा कोरोनात व्यस्त, त्यामुळे डेंगू चिकनगुनिया मलेरियाला फावले मस्त

सर्वच यंत्रणा  कोरोनात व्यस्त, त्यामुळे डेंगू चिकनगुनिया , मलेरियाला  फावले मस्त.

PRESS MEDIA LIVE. : सांगली :

सांगली जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तसेच ग्रामंपचायत ते जिल्हा परिषद आणि नगरपालिका, महापालिका 'कोरोना'मध्ये गुंतल्या आहेत. त्यामुळे डेंग्यु, चिकुनगुनिया, मलेरिया प्रतिबंधक उपाययोजनांकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी जिल्हाभर डासांचा उच्छाद सुरू आहे. तापाचे रुग्णही वाढले आहेत. डेंग्यू, चिकुनगुनियाच्या उद्रेकाची भीती व्यक्त होत आहे. जिल्ह्यात मार्चपासून 'कोरोना'चा प्रादुर्भाव सुरू आहे. तेव्हापासून सारी यंत्रणा कोरोना नियंत्रण, तपासणी, उपचार यामध्ये गुंतली आहे. एप्रिल व मे महिन्यता डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया तपासणीसाठी रक्तनमुने संकलन कमी झाल्याकडे वरिष्ठ कार्यालयाने लक्ष वेधले होते.कोरोनाचा प्रादुर्भाव असला तरीही डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया आजारांचे नियमित सर्वेक्षण, रक्तजल नमुने संकलन वाढवावे, असे निर्देश वरिष्ठ कार्यालयाने यापूर्वीच दिलेले आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्षच झालेले आहे. जून महिन्यात ग्रामीण भागातील केवळ 40 सॅम्पलची आणि सांगली महापालिका क्षेत्रात 19 सॅम्पलची तपासणी झाली. जुलै महिन्यात तर ग्रामीण भागातील 16 आणि महापालिका क्षेत्रातील 12 सॅम्पलची तपासणी झाली. सॅम्पल संख्या अतिशय कमी असल्याचे त्यातून दिसून येते. परिणामी रुग्ण संख्याही कमी दिसून येत आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया प्रतिबंध कार्यक्रम दुर्लक्षित झाल्याचे त्यातून स्पष्टपणे दिसत आहे.

डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया नियंत्रणाकडेही आरोग्य यंत्रणा तसेच ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, त्याकडे पुरेसे लक्ष नाही. सध्या सर्व यंत्रणा कोरोनामध्ये गुंतली आहे .डें ग्यू, चिकुनगुनिया या आजारांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही. मनुष्यबळ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. जनजागृतीही आवश्यक आहे.

डेंग्यू, चिकुनगुनिया नियंत्रणाबाबत निर्देश : कोरे, डुडी

'जिल्ह्यात डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया नियंत्रण तसेच या आजारांविषयी लोकांमध्ये जागृती करणे आवश्यक आहे. विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत स्तरावर दि. 14 ऑगस्ट रोजी 'ड्राय डे'चे पालन करावे. रांजण, माठ, हौद, टाक्यातील पाणीसाठी आठवड्यातून एकवेळ रिकामे करून स्वच्छ पुसून कोरडे करावेत. घट्ट झाकण लावावे. रिकाम्या न करता येणार्‍या पाणी साठ्यात अळीनाशकाचा (टेमीफॉस) वापर करावा. पिण्याच्या पाण्यामध्ये अळीनाशक वापरू नये. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, जलसुरक्षक, आशा, अंगणवाडी सेविका, स्वच्छाग्रही यांनी त्यासाठी जबाबदारी घ्यावी. परिसर स्वच्छता व सांडपाणी व्यवस्थापन करावे. गटारी साफ करून वाहत्या कराव्यात. धूर फवारणी व बीटीआय पावडरचा वापर करावा. या उपाययोजनांचा अहवाल गटविकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्हा परिषदेला पाठवावा', असे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

Post a comment

0 Comments