लाखो रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी

 लाखो रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी देवेंद्र जैनसह दोघांवर गुन्हा दाखल.

PRESS MEDIA LIVE : पुणे :

पुणे : जमीन व्यवहाराशी काहीही संबंध नसताना तिच्या नोंदीला हरकत घेऊन 15 लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणात स्वयंघोषीत पत्रकार देवेंद्र जैन याच्यासह दोघांवर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये जैनने खोट्या बातम्या देऊन बदनामी केली असल्याचे म्हटले आहे. सदाम ऊर्फ दत्तात्रय ऊर्फ बाळासाहेब गुलाबराव कामठे याला अटक करण्यात आली असून देवेंद्र जैन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मोहन राजू बहिरट (26 , रा. कामठे मळा, फुरसुुंगी) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन बहिरट यांचे आजोबा सदाशिव कामठे यांनी शेवाळवाडी येथील जमीन नोव्हेंबर 2015 मध्ये विक्रीसाठी काढली होती. त्याचा संजय हरपाळे यांच्याबरोबर व्यवहार करण्यात आला होता. त्यावेळी सदाम कामठे याने माझ्यामार्फतच व्यवहार करायचा, नाही तर व्यवहार होऊ देणार नाही अशी धमकी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासात आरोपींनी 34 लाख रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. तर फिर्यादी मोहन बहिरट हा सदाम कामठेच्या बहिणीचा मुलगा आहे. तेव्हा भितीपोटी कामठे याला हरपळे यांनी 2 लाख 70 हजार रुपये दिले. मात्र तरीही या व्यवहाराची नोंद वर होऊ नये, म्हणून त्याने हरकतीचा अर्ज करुन फिर्यादीचे आजोबा व हरपळे यांच्याकडे 25 लाखांची मागणी केली. त्यातील 5 लाखांचा धनादेश घेतला. त्यानंतर त्याने हरकतीचा अर्ज मागे घेण्यासाठी 1 कोटी रुपयांची मागणी करुन काहीही संबंध नसताना 15 लाख रुपये घेतले .

दरम्यान, फिर्यादी मोहन बहिरट हे या मिळकतीवर गेले असताना त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तर जैनने जमिनीबाबत अवैध्य उत्खनन, पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा अशा खोटया बातम्या प्रसिध्द करुन बदनामी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post