पुणे. खऱ्या अर्थाने पत्रकार देखील

 खऱ्या अर्थाने पत्रकार देखील करोनायोद्धे : राजेश पांडे.

 PRESS MEDIA LIVE : पुणे ( प्रतिनिधी) :

पुणे – करोना परिस्थितीत रस्त्यावर उतरून पत्रकार स्वतःचा जीव धोक्‍यात घालून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम करीत आहे. डॉक्‍टर, समाजसेवकांसोबतच पत्रकारदेखील खऱ्या अर्थाने करोनायोद्धे आहेत, असे मत भाजपचे शहर सरचिटणीस राजेश पांडे यांनी व्यक्‍त केले.

पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या पत्रकारांसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मदतीने आणि सरचिटणीस राजेश पांडे यांच्या पुढाकारातून शिधा वाटप करण्यात आला. त्यावेळी पांडे बोलत होते.

त्यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश भोईटे, विश्‍वस्त कार्यवाह विठ्ठल जाधव, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, नगरसेवक गणेश बिडकर, समीर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सुहाना मसाल्याचे विशाल चोरडिया यांच्या वतीनेदेखील मसाल्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी संवादचे सुनील महाजन यांनी सहकार्य केले. प्रत्यक्ष कार्यक्रमात उपस्थित राहू न शकलेले आमदार चंद्रकांत पाटील यांनी दूरध्वनीवरून पत्रकारांशी संवाद साधला.

पांडे म्हणाले, करोना पार्श्‍वभूमीवर समाजातील अनेक घटकांना समस्यांना सामोरे जावे लागले. त्यात समाजाचे प्रबोधन करणारा पत्रकार हा घटकही अडकला असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments