साखर आयुक्त कार्यालयात कोरोना.

 

    साखर आयुक्त कार्यालयात 'कोरोना किलर' विषाणूनाशक उपकरण                                                               

PRESS MEDIA LIVE :   पुणे  :

राज्याच्या साखर आयुक्त कार्यालयात विषाणूनाशक कोरोना किलर उपकरण बसविण्यात आले आहे.इलेक्ट्रोनिक्स इंजिनियर असलेल्या भाऊसाहेब जंजिरे यांच्या इंडोटेक इंडस्ट्रीयल सोल्युशन्स प्रा.लि  (पुणे) या कंपनीने 'आयनायझेशन' च्या तत्वावर तयार केलेल्या 'कोरोना किलर' विषाणूनाशक उपकरणाचे प्रात्यक्षिक आज बुधवार दि १२ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील साखर आयुक्त कार्यालयात दाखविण्यात आले.प्रात्यक्षिकानंतर हे उपकरण  कार्यालयात बसविण्यात आले.भाऊसाहेब जंजिरे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .  'कोरोना मुळे अनेक उद्योगांप्रमाणे साखर उद्योगही अडचणीत आला आहे. साखर कारखान्यांमधील कामकाजावर परिणाम झाला आहे .अशा पार्श्वभूमीवर विषाणू,बुरशी आणि बॅक्टेरिया नाशक इलेक्ट्रॉनिक उपकरणे साखर कारखान्यांना उपयुक्त  ठरतील.साखर कारखान्यांना ,संबंधित कार्यालये आणि आस्थापनांना या उपकरणांमुळे निर्धोकपणे दैनंदिन कामकाज करता येईल.' असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. 

 आयसीएमआर ,राष्ट्रीय विषाणु संशोधन संस्था ,नायडू हॉस्पिटल यांनी 'कोरोना किलर ' विषाणू नाशक   इलेक्ट्रॉनिक उपकरणाला दिलेली  कार्यक्षमता प्रमाणपत्र यावेळी साखर आयुक्तांना  देण्यात आली .    भाऊसाहेब जंजिरे  म्हणाले ,'हे इलेक्ट्रॉनिक उपकरण अत्यंत चांगल्या पद्धतीने काळाची गरज ओळखून तयार केलेले  आहे. आवश्यक परीक्षण संस्थांची प्रमाणपत्रे असल्याने   हे उपकरण सगळीकडे लावणे शक्य  आहे . ज्या हॉस्पिटलमध्ये कोविड -१९ चे रुग्ण  आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये ,सेंटरमध्ये डिसन्फेक्ट करण्यासाठी हे उपकरण अत्यंत महत्त्वाचे  काम करीत आहे .' 

 आयनायझेशन च्या माध्यमातून कोरोना व्हायरस च्या आवरणास नष्ट करून व्यक्तीचे कोरोना विषाणू पासून रक्षण करणाऱ्या 'कोरोना किलर ' या इलेक्ट्रॉनिक उपकरणास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( आयसीएमआर ),नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी तर्फे  जुलै २०२० मध्ये कार्यक्षमता प्रमाणपत्र  देण्यात आले  आहे .पुण्यातील इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रा.लि .या कंपनीने संशोधित केलेले आणि  अशा स्वरूपाची मान्यता मिळवणारे हे पहिले उपकरण आहे .  

'कोरोना किलर ' हे फक्त विजेवर चालणारे आणि साबण किंवा सॅनिटायझर न लागणारे हे इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे . ते कोणत्याही बंद परिसरात वापरता येते . घर ,हॉस्पिटल ,शाळा ,हॉस्पिटल ,गाड्या ,विमान, प्रयोगशाळा ,क्वारंटाईन सेंटर ,कारखाने ,मंदिरे अशा कोणत्याही ठिकाण ते वापरता येते .  या इलेक्ट्रॉनिक उपकरणास इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ( आयसीएमआर ),नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी तर्फे मान्यता देण्यात आली आहे . तसेच पुण्यातील नायडू रुग्णालयानेही यशस्वी वापराचे प्रमाणपत्र दिले आहे. कोविड रुग्णाचे मास्क ,हातमोजे ,बेडशीट आणि इतर वस्तूंचे निर्जंतुकीकरण करण्यास देखील हे उपकरण उपयोगी ठरते.                                                                                                                                                                                                                     

Post a Comment

Previous Post Next Post