बिग बाजार वर मुकेश अंबानी चा ताबा.

 बिग बझारवर मुकेश अंबानींचा ताबा; रिलायन्स रीटेलमधील 'बेताज बादशाह'

PRESS MEDIA LIVE :

         रिलायन्स इंडस्ट्री रिटेल क्षेत्रामध्ये मोठा विस्तार करू लागली असून ऑनलाईन फार्मसी कंपनी नेटमेड्स खिशात घातल्यानंतर आता रिटेल क्षेत्रातील फ्युचर ग्रुपची सर्वात मोठी कंपनी बिग बझार, फूड बझारवरही 'कब्जा' केला आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ने फ्युचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल बिझनेस तसेच लॉजिस्टिक अँड वेअरहाऊसिंग बिझनेस खरेदी केला आहे.हा व्यवहार लवकरच पूर्णत्वास येणार असून 24713 कोटी रुपयांना ही डील झाली आहे.यामुळे बिग बझार, फूड बझार, ई-झोन आणि अन्य रिटेल व्यवसाय रिलायन्सच्या ताब्यात आले आहेत. या डीलमुळे रिलायन्स रिटेल क्षेत्रातील बेताज बादशाह बनली आहे. हा व्यवहार झाल्यावर फ्यूचर ग्रुपचा रिटेल आणि होलसेल व्यवसाय रिलायन्स रिटेल अँड फॅशन लाईफस्टाईल लिमिटेड (RRFLL) अंतर्गत येणार आहे. RRFLL ही RRVLच्या पूर्ण मालकीची कंपनी आहे.

औरंगाबाद जिल्हाधिकारयांची बेकायदेशीर औषधे विकणारया मेडीकल  स्टोअर्सवर धडक कारवाई

          जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या निर्देशानुसार अन्न व औषध प्रशासन तसेच कलेक्टर ऑफिस मधील प्रतिनिधी यांच्या पथकाने शहरातील काही औषधी दुकानांची पाहणी केली. या दरम्यान सुमारे ८ औषधी दुकानांची पाहणी करण्यात आली. सदर पाहणीत असे आढळून आले की, वेलनेस फॉर एव्हर केमिस्ट, उस्मानपुरा आणि खाटकेश्वर हेल्थ केअर सिडको या दोन दुकानांमधून बेकायदेशीर रित्या *शेड्युल एच* औषधाची विक्री सर्रासपणे होताना आढळून आले.परिणामी या दोन दुकानांवर कारवाई करून नोटीस बजावण्यात येणार आहे.तसेच गुरुनानक मेडिकल स्टोअर्स व संत एकनाथ मेडिकल स्टोअर्स ,उस्मानपुरा यांची विक्री नियमाचे पालन करुन सुरू असल्याचे यावेळी निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन के ले.


 *To

Post a comment

0 Comments