नागपूर जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर

 

नागपूर जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना संसर्गाचा पार्श्वभूमीवर नागपूर येथे पाहणी दौरा केला. 

PRESS MEDIA LIVE : नागपूर.

नागपूर : येथे असलेल्या प्रमुख आरोग्य केंद्र, उपचार सुविधा, तपासणी केंद्र, ऑक्सीजन सुविधा व हॉस्पिटल्स मधील खाटांची उपलब्धता याबाबत प्रमुख आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली. तसेच आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या आढावा बैठकीत नागपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रत्येक उपाययोजनेबाबत आढावाही घेतला.

वाढती रुग्ण संख्या पाहता संपूर्ण जिल्ह्यात उपाययोजना वाढवण्याची सूचना केली. ज्यामध्ये अँटीजेन टेस्ट, वाढीव उपचार सुविधा तसेच ऑक्सीजन सुविधा यांची वाढ करण्याबाबत सूचना केल्या. तसेच हा वाढता आवाका पाहता वाढीव मनुष्यबळ व त्यांचे मानधन याबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मेडिकल कॉलेजला पूर्वीप्रमाणे पोस्टिंग देण्याचे सुचविले. मेडिकल असोसिएशनला तज्ञ (स्पेशालिस्ट) पुरवण्याविषयी महत्वपूर्ण सूचना केल्या. याप्रसंगी डॉ. संजय जायस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. श्री. मिश्रा, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्री. केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्री. सेलोकर, डॉ. गावंडे, इतर आरोग्य अधिकारी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments