मुंबई. उत्तर प्रदेशातील दलित सरपंचाच्या हत्येचा तीव्र निषेध


  उत्तर प्रदेशातील दलित सरपंचाच्या  हत्येचा तीव्र निषेध

13 वर्षांच्या दलित मुलीच्या बलात्कार आणि क्रूर हत्येच्या अमानुष गुन्ह्यातील जातीवादी गुन्हेगारांना फाशीची शिक्षा  द्या - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

PRESS MEDIA LIVE : मुंबई

मुंबई दि.16 -  उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील इसापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 वर्षांच्या दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. तिचे डोळे काढून तिची जीभ छाटून अमानुष हत्या करण्यात आली. या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या हत्याकांडाचा तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षातर्फे करण्यात आला असून आज पुन्हा उत्तर प्रदेशात आझमगड जिल्ह्यातील बांसगावच्या दलित सरपंचाची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. सवर्ण ठाकूर समाजाच्या लोकांना लवून नमस्कार केला नाही या कारणाने जातीवादी गुन्हेगारांनी दलित सारपंच सत्यमेव जयते यांची गोळ्या घालून हत्या केली. या निर्घृण हत्येचा तीव्र निषेध रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.  रामदास आठवले यांनी  केला आहे. या दोन्ही प्रकरणी ना रामदास आठवले यांनी तातडीने उत्तर प्रदेश चे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्या यांच्याशी संपर्क साधून गुन्हेगारांना त्वरित अटक करण्याची त्यांना फाशी ची शिक्षा करण्याची मागणी केली आहे.                 

                  

Post a comment

0 Comments