मुंबई. नागरिकांनी अत्यावशक कारणांसाठी घराबाहेर पडावे

नागरिकांनी अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.


PRESS MEDIA LIVE : मुंबई : गणेश राऊळ.

मुंबई : मुंबईला पावसाने चांगलेच झोडपले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई व परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या आहेत. बुधवारपासून जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी व अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना महापालिका, पोलीस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post