इचलकरंजी :

इचलकरंजी येथे माजी नगराध्यक्षासह त्यांच्या घरातील दोघांचा, तर पोलीस अधिकारी व त्यांच्या पत्नी चा अहवाल पॉझिटिव्ह.

PRESS MEDIA LIVE  : इचलकरंजी :  मनु फरास

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून बुधवारी माजी नगराध्यक्षांसह त्यांच्या घरातील दोघांचा तर एक पोलिस अधिकारी व त्यांच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, शहरातील पोलिस यंत्रणेमध्ये वाढता संसर्ग प्रशासनाच्या चिंतेची बाब बनली आहे. बुधवारी शहरात 53 नवीन रुग्णांची भर पडली तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मृत रुग्णांवर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मृतामध्ये राजराजेश्‍वरीनगर येथील 60 वर्षीय महिलेचा व साई मंदिर परिसरातील 61 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. शहरात एकूण बळींची संख्या 78 वर शहरातील सुतार मळा, दत्त कॉलनी, स्फूर्तीनगर विलास जोशी रुग्णालयाजवळ, सातपुते गल्‍ली, यशवंत कॉलनी, शाहू हायस्कूल परिसर, कोले मळा, पंचवटी थेटर परिसर, मंगलधामजवळ, आमराई रोड, नदीवेस दत्त मंदिरजवळ, दत्तनगर भाटले गल्‍ली, संभाजी चौक परिसर, अष्टविनायक कॉलनी नकोडा नगर, स्वामी अपार्टमेंटसमोर, वेदभवन जवळ, लालनगर, घोडकेनगर, स्टारनगर, संग्राम चौक, संत मळा, बरगाले मळा, दातार मळा, ढोर गल्‍ली येथील प्रत्येकी एक तर शिवाजीनगर 2, थोरात चौक 4, जवाहरनगर 3, पाटील मळा शहापूर 2, शहापूर 3, मयूर हॉटेलजवळ 3, झेंडा चौक 2, गाव भाग 2, राजराजेश्‍वरीनगर 3, वृंदावन कॉलनी 2 असे विविध 36 भागांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.


पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कतील नागरिकांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे. सध्या 949 जणांच्यावर उपचार सुरू आहेत तर 554 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील एकूण बाधितांची संख्या 1,581 वर गेली. आहे.

Post a Comment

Previous Post Next Post