केंद्र सरकारचे नवे शैक्षणिक धोरण पुन्हा नव्याने उतरंड निर्माण करणारे

 केंद्र सरकारचे नवे शैक्षणिक धोरण हे पुन्हा नव्याने उतरंड निर्माण करणारे असून गरिबांचा हक्क डावलणारे आहे. माजी खासदार राजू शेट्टी.

PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :

तारीख १२ केंद्र सरकारचे नवे शैक्षणिक धोरण हे पुन्हा नव्याने उतरंड निर्माण करणारे असून गरिबांचा हक्क डावलणारे आहे. हे धोरण भारतीय संविधानाच्या संघराज्यीय रचनेपासून धर्म निरपेक्षतेपर्यंत सर्व मूल्यांना धक्का लावत सामाजिक न्यायाला बाधा पोहोचवणारे असल्यामुळे त्याला विरोध करणे गरजेचे बनले आहे. शिक्षणासारखे विधेयक कोणतीही चर्चा न करता अध्यादेशाद्वारे पारित करणे हे संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने हानीकारक आहे. पुढील पिढ्यांचे आणि पर्यायाने नव्या भारताचे भवितव्य ठरवणारा विषय इतक्या मनमानी पद्धतीने हाताळणे अत्यंत चुकीचे आहे. म्हणूनच या धोरणाच्या तीव्र विरोध देशभर सुरू झाला आहे.छत्रपती शाहूंराजांच्या शिक्षण विचारालाच सुरुंग लावणाऱ्या या विषमतावादी धोरणाला विरोध करण्याची गरज आहे.यात सर्व सुज्ञ नागरिकांनी,शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी सहभाही व्हावे.या जनजगरणाची सुरुवात म्हणून येत्या पाच सप्टेंबरला  जिल्हाधिकारी कार्यालय व प्रांत कार्यालय याठिकाणी या विषमतावादी धोरणाची प्रतिकात्मक होळी करण्यात येईल असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनी येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.समता संघर्ष समिती व सर्वपक्षीय कृती समिती यांच्या वतीने लॉक डाऊनचे सर्व नियम पाळून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत सदा मलाबादे यांनी केले.तर प्रास्ताविक गिरीश फोंडे यांनी केले.यावेळी मदन कारंडे,प्रसाद कुलकर्णी,वि.ह.सपाटे, बजरंग लोणारी,शरद कांबळे, शशिकांत पाटील,अशोक हुबळे,धोंडिबा कुंभार यांच्यासह अनेकांनी या धोरणातील विविध उणिवांची तपशीलवार मांडणी केली.

      या बैठकीतून असे मत व्यक्त झाले की,शाळेत जाणाऱ्या वयोगटातील प्रत्येक मुलाला नजीकच्या अंतरावर उत्तम प्रतीचे शिक्षण देण्याची राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. मात्र नव्या धोरणात लहान -लहान शाळा बंद करून शैक्षणिक मॉल उभे करण्याचे भांडवली व तद्दन व्यापारी हित साधले जात आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात समन्वयापेक्षा संघर्ष वाढवण्याची शक्यता आहे. आणि समते पेक्षा विषमता वाढण्याची भीती आहे.

              या बैठकीला  जयकुमार कोले ,महेश लोहार, दत्ता माने,सयाजी चव्हाण, विनायक चव्हाण,नाना पारडे, विश्वास फरांडे ,राजन मुठाणे, सदा लोकरे ,शिवाजी शिंदे ,निलेश पाटील, संजय लोटके, महेश शेंडे, गौस अत्तार,शितल माने, हेमंत वणकुद्रे ,गोवर्धन दबडे ,रवी गोंदकर ,रोहित दळवी, विकास चौगुले, शिवाजी शिंदे, निलेश पाटील ,विठ्ठल माने,ओम कोष्टी, शकील मुल्ला ,रावसाहेब निर्मळे आदी विविध पक्ष व संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो : नव्या शैक्षणीक धोरणाविरोधी बैठकीत बोलताना माजी खासदार राजू शेट्टी सोबत प्रसाद कुलकर्णी, सदा लोकरे,मदन कारंडे,सदा मलाबादे, गिरीश फोंडे

Post a comment

0 Comments