पुणे. : उद्योग मंत्र्यांकडून पाहणी.


रुग्णालये आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये विषाणूनाशक यंत्रणा लावण्याचा प्रस्ताव . विचाराधीन :उद्योग मंत्री सुभाष देसाई                                                                          कोरोना किलर ' इलेक्ट्रॉनिक उपकरणाची उद्योग मंत्र्यांकडून पाहणी                                 

 PRESS MEDIA LIVE. :.   पुणे  :  (प्रतिनिधी ) :

आयनायझेशन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कोरोना सारख्या विषाणू चा नाश करणाऱ्या 'कोरोना किलर ' इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे संशोधन सद्यस्थितीत महत्वाचे असून रुग्णालये आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये विषाणूनाशक यंत्रणा लावण्याचा प्रस्तावावर आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत ',असे राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी सांगितले .  पुण्यातील अभियंता आणि इंडोटेक इंडस्ट्रियल सोल्युशन्स प्रा .लि .चे संचालक भाऊसाहेब जंजिरे यांनी मुंबई येथे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन त्यांना या अभिनव संशोधनाची माहिती दिली आणि प्रात्यक्षिक दाखवले . आयसीएमआर ,राष्ट्रीय विषाणु संशोधन संस्था ,नायडू हॉस्पिटल यांनी 'कोरोना किलर ' विषाणू नाशक  इलेक्ट्रॉनिक उपकरणाला दिलेली  कार्यक्षमता प्रमाणपत्र यावेळी उद्योग मंत्र्यांना देण्यात आली .    

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले ,'हे इलेक्ट्रॉनिक उपकरण अत्यंत चांगल्या पद्धतीने काळाची गरज ओळखून तयार केलेले  आहे. आवश्यक परीक्षण संस्थांची प्रमाणपत्रे असल्याने   हे उपकरण सगळीकडे लावणे शक्य  आहे . ज्या हॉस्पिटलमध्ये कोविड -१९ चे रुग्ण  आहेत, त्या हॉस्पिटलमध्ये ,सेंटरमध्ये डिसन्फेक्ट करण्यासाठी हे उपकरण अत्यंत महत्त्वाचे  आहे आणि त्यासंदर्भात आरोग्य खात्याचे मंत्री  राजेश टोपे यांच्याशी बोलू . त्या प्रकारचा प्रस्ताव सादर करावा , औद्योगिक आस्थापनांमध्ये  हे मशीन लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल. 
यावेळी ' फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडल  ' या संघटनेचे  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल उपस्थित होते. 
--------------------------------------------------                                                             फोटोओळ : उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करताना डावीकडून विजयसिंह डुबल ,भाऊसाहेब जंजिरे 

Post a Comment

Previous Post Next Post