ब्रेकिंग :. इचलकरंजी ..


इचलकरंजीतील कुडचे मळा येथे सापडलेला पहिला रुग्ण आज  मयत झाला.

PRESS MEDIA LIVE :  ( इचलकरंजी :  मनु फरास )

इचलकरंजी : शहरातील कुडचे मळा येथे सापडलेला पहिला रुग्ण आज मयत झाला. पंचावन्न वर्षाची ही व्यक्ती यंत्रमाग कामगार होती. कोल्हापूर येथे उपचारासाठी सुरू असताना त्याने रुग्णालयातून पळ काढला होता. मात्र प्रशासनाने त्याला पुन्हा उपचारासाठी दाखल केले होते .


इचलकरंजी शहरात हॉटस्पॉट बनलेल्या कुडचे मळा परिसरात आज मयत झालेली 55 वर्षाची व्यक्ती ही पहिला रुग्ण ठरला होता. त्याला उपचारासाठी प्रशासनाने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रुग्णालयातून पळ काढून ही व्यक्ती थेट इचलकंजी येथे आली होती. येताना ही व्यक्ती रिक्षातून आला होती. त्या रिक्षाचालकाचा अहवाल कोरूना पॉझिटिव्ह आला आहे.भागातील नागरिकांना ही घटना समजताच त्यांनी तातडीने त्याचे घर बाहेरून बंद करून प्रशासनाला कळवले होते. त्यानंतर प्रशासनाने त्याला पुन्हा उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठवले होते. मात्र उपचारासाठी तो फारसा प्रतिसाद देत नसल्याची माहिती  प्रशासनाने दिली. उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या घरातील मुलगा व नात हीसुद्धा कोरोना पॉझिटिव आहेत. त्यांच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत.
दरम्यान, यामुळे शहरातील कोरोना बाधित व्यक्तिंची मृत्यू संख्या तीन वर पोहोचली आहे. आज अखेर एकूण इचलकरंजी शहरात 40 रुग्ण सापडले आहेत तर 6 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. उर्वरित 31 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post