प्रेस मीडिया लाईव्ह :
कोल्हापूर -स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने एम.डी.अंमली पदार्थांची तस्करी करीत असलेल्या मुंबई येथील पोलिस रेकॉर्ड वरील आरोपी अतुल गुणकर शेट्टी (वय 50.रा.वसईगांव,ता.वसई जि.पालघर ) याला अटक करून त्याच्या कडील 22 gm.वजनाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी अंमली पदार्थांचा साठा आणि विक्री करीत असलेल्या पोलिस रेकॉर्ड वरील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
वरिष्ठांनी दिलेल्या सुचने प्रमाणे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपास पथक तयार करून अंमली पदार्थांची तस्करी करीत असलेल्या गुन्हेंगाराची माहिती घेऊन तपास करीत असताना या पथकातील पोलिस अंमलदार वैभव पाटील यांना माहिती मिळाली की,मुंबई येथील पोलिस रेकॉर्ड वरील एक जण अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पुणे-मुंबई हायवे रोडवर असलेल्या हॉटेल मेव्हणे-पाव्हणे येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती.मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी आपल्या पथकासह दुपारच्या सुमारास सापळा रचून अतुल शेट्टी याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 67 हजार 230/ रुपये किमंतीचा 22.41 gm. वजनाचा अंमली पदार्थ मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला.
अतुल शेट्टी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता अतुल शेट्टी यांनी आणि त्याच्या साथीदारांनी 2008 साली मुंबई येथे एका व्यावसायिकाचा खून करून 63 कोटी रुपयांचा दरोडा टाकला होता.त्यांच्यावर मुंबई येथील डीसीबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती.ती शिक्षा भोगून बाहेर आला होता.अतुल शेट्टी याला अंमली पदार्थांसह ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याचा पुढ़ील तपास शिरोली एमआयडीसी पोलिस करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील,अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.धीरजकुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर ,पोलिस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलिस अंमलदार वैभव पाटील,अरविंद पाटील,महेद्र कोरवी,प्रविण पाटील,विशाल खराडे,परशुराम गुजरे,शिवानंद मठपती,योगेश गोसावी ,संतोष बर्गे,गजानन गुरव,नामदेव यादव ,सचिन जाधव,प्रदिप पाटील,अशोक पवार ,विशाल खराडे ,यशवंत कुंभार आणि महादेव कुराडे यांनी केली.