प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर - हातकंणगले तालुक्यातील नागाव येथील ओम तानाजी सावंत (वय 17.रा.माळवाडी ,सावंत गल्ली,नागाव) याने घरातील लाकडी वाशाला दोरीने गळफास लावून घेतल्याने हा प्रकार नातेवाईकांच्या निदर्शनास येताच त्याच्या गळ्यातील गळफास सोडवून बेशुध्दावस्थेत खाजगी रुग्णवाहिकेतुन सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्याचा उपचारापूर्वी मृत्यु झाला.हा प्रकार बुधवार (दि.30 एप्रिल ) रोजी दुपारी चारच्या सुमारास घडला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
ओम सावंत हा अकरावीच्या वर्गात शिकत होता.त्याने नुकतीच अकरावीची परिक्षा दिली होती.
त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.