बक्षीसाचे एक लाख कोणाला देणार...?

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : प्रतिनिधी :

पोलिसांनी आरोपी दत्ता घडेला शोधून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. सर्वच गावकऱ्यांनी मदत केली तर याचं श्रेय कोणाला जातं आणि ते बक्षीस कोणाला देणार असा प्रश्न अमितेश कुमार यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला अमितेश यांनी उत्तर देताना, "तपास प्राथमिक पातळीवर आहे. आरोपीला पकडण्याबाबत कोणताच श्रेयवाद नाही. हे टीम वर्क आहे. गुन्हा घडल्यानंतर त्याच दिवशी आमची टीम त्या गावात पोहोचली होती. परंतु प्रयत्न करूनही तो सापडला नाही," असं म्हणाले.

पुढे बोलताना अमितेश यांनी दत्ता गाडेला शोधून देण्यासाठी जाहीर करण्यात आलेलं एक लाखाचं बक्षीस कोणाला देणार याबद्दल स्पष्ट माहिती दिली. "सर्वात शेवटची ज्यांच्या माहितीवरून आरोपीचा सुगावा लागला त्यांना एक लाखाचे बक्षीस देणार आहे," असं अमितेश कुमार म्हणाले. मात्र लगेच त्यांनी, "त्याचप्रमाणे गावासाठी काय करता येईल त्याचा देखील विचार करणार आहे," असं अमितेश कुमार म्हणाले आहेत.

कोणी दिली दत्ता गाडेची माहिती?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता गाडे गुरुवारी रात्री त्याचा नातेवाईक महेश बहीरट यांच्या घरी साडेदहा वाजता आला होता. दत्ता गाडे घरी आल्याची माहिती या नातेवाईकानेच पोलिसांना दिली. दत्ता गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली. 'माझी मोठी चूक झालीये, मला सरेंडर करायचं' असं सांगून तो तिथून निघून गेला. त्यानंतर रात्री उशीरा पोलिसांनी या घराच्या परीसरात दत्ता गाडेचा शोध सुरु केला. याच शोध मोहिमेत अडीच तास शोध घेतल्यानंतर दत्ता गाडे कॅनलजवळ सापडला. आता सुरुवातीची माहिती देणाऱ्या महेश बहीरट यांच्या कुटुंबाला हे बक्षीस देणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post