रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात आंबेडकरी कार्यकर्त्यांची आघाडी संविधान सन्मान रथाच्या माध्यमातून शंभर वस्त्यांमधून प्रचार

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : रिपब्लिकन , दलित व आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुणे शहरातील सुमारे शंभर वस्त्यांमधून संविधान सन्मान रथ द्वारे प्रचार करण्यात आलेला आहे. 25 ठिकाणी कॉर्नर बैठका , प्रचार पत्रकांचे वाटप,  विविध बैठकांचे नियोजन , मेळावे याद्वारे हा प्रचार करण्यात आलेला आहे. संविधान पे चर्चा या कार्यक्रमास भरघोस प्रतिसाद.

काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री नितीन राऊत यांच्या समवेत आज काँग्रेस भवन येथे आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गेल्या महिन्याभरापासून धंगेकर यांच्या प्रचारासंदर्भामध्ये आंबेडकरी चळवळीकडून करण्यात आलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. " संविधानाच्या मुद्द्यावर आंबेडकरी चळवळीमध्ये असंतोष असून भाजप विरोधी लाट पसरलेली असुन भाजपाच्या पराभवासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत.  कोणत्याही अपेक्षे शिवाय आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते प्रचारांमध्ये मोठं योगदान देत असल्याने काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास यावेळी नितीन राऊत यांनी व्यक्त केला." 

" प्रस्थापित आंबेडकरी नेत्यांची भूमिका विचारधारेच्या विसंगत असल्याने प्रचार कालावधीमध्ये आंबेडकरी समुदायाकडनं अत्यंत सकारात्मक प्रतिसाद प्राप्त झालेला आहे , त्यामुळे कोणत्याही प्रकारे मत विभागणीचे मनसुबे हाणुन पाडत रवींद्र धंगेकर यांना दलित समाजाची व आंबेडकरी चळवळीची मते मिळून ते विजयी होतील. " असा विश्वास रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी दिला. 

यावेळी काँग्रेस पक्षाचे सचिव गौतम आरकडे, सुजित यादव , प्रियंकाताई रणपिसे , शैलेंद्र मोरे , अशोक जगताप , विनोद रणपिसे , सुंगरताई ओव्हाळ , सोनियाताई ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते. 

अरविंद शिंदे 

अध्यक्ष 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी 

९८२२०२०००५

Post a Comment

Previous Post Next Post