7 मे रोजी पुण्यात एमआयएमच्या बैठकीत असदुद्दीन ओवेसी येणार


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुती आणि वंचित यांच्या उमेदवारांसह ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम)चे अनीस सुंडके रिंगणात आहेत. सुंदके यांच्या प्रचारासाठी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी ७ मे रोजी पुण्यात सभा घेणार आहेत. मात्र सभेचे ठिकाण अद्याप ठरलेले नाही. अनीस सुंडके यांनी ही माहिती दिली आहे. एका वृत्तपत्रातील मुलाखती दरम्यान म्हणत होते .

अनीस सुंडके म्हणाले, आगामी विधानसभा व महापालिका निवडणुकीसाठी आतापासूनच कामाला सुरुवात केली आहे. पुणे शहरातून एक आमदार आणि महापालिकेत 30 नगरसेवक निवडून आणण्याचे एमआयएमचे उद्दिष्ट आहे. याअंतर्गत मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू असल्याचे अनीस सुंदके पुढे म्हणाले की, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. मुस्लिम मतांचा वापर फक्त निवडणुकीसाठी केला जातो.

 मुस्लिम समाजाचे प्रश्न, समस्या, शिक्षण, बेरोजगारी आदी मूलभूत गोष्टी दुर्लक्षित आहेत. सुंडके यांनी ही खंत व्यक्त केली आहे. काँग्रेसवर आरोप करताना अनीस सुंडके म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मुस्लिम कार्यकर्त्यांचा आणि समाजाचा राजकारणासाठी वापर केला आहे. मुस्लिम समाजाच्या मागण्यांकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले. एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर भाष्य करताना सुंदके म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मला काम करण्याची संधी दिली.

 या पक्षांनी मला नगरसेवक आणि स्थायी समिती सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यावेळी मी जात-धर्माच्या पलीकडे जाऊन काम केले. सुंडके म्हणाले की, स्थायी समिती अध्यक्ष असताना पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासाठी जागा मंजूर करून घेतली. भवानी पेठेत रफी अहमद किडवाई शाळा बांधली.

Post a Comment

Previous Post Next Post