मोठी बातमी : एक लाखांची लाचेची मागणी करणाऱ्या एक्साईज अधीक्षकाच्या घरावर छापा .



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - बिअर बार शॉपी चालू करण्यासाठी चंद्रपुर येथील तक्रार दाराकडे एक लाख रुपये लाचेची मागणी करणारा चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अधिक्षक संजय जयसिंगराव पाटील (रा.आर .के.नगर कोल्हापूर ) यांच्या कोल्हापुरातल्या ठिकठिकाणी स्वमालकीच्या मालमत्ता असलेल्या ठिकाणी छापा टाकून 28 तोळे सोन्याच्या दागीन्यासह एक कार आणि दोन दुचाकी मोटारसायकली असा एकूण 20 लाख रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई चंद्रपूरच्या लाचलुचपतच्या पथकाने केली.

अधिक माहिती अशी की,चंद्रपूर येथील तक्रारदाराला बिअर शॉपी चालू करायची होती.त्या साठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा परवाना हवा होता.त्या साठी संबंधित विभागाकडे अर्ज केला होता.परवाना देण्यासाठी तक्रारदाकडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली होती.त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.सदर राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संजय पाटील यांनी आपल्या कर्मचारी यांच्या मार्फत लाचेची मागणी केली होती त्या नुसार त्या विभागातील दोन कर्मचारी यांना लाचलुचपतच्या पथकाने एक लाख रुपये लाच घेताना रंगेहात पकडून त्यांच्यावर कारवाई केली.याचा सुगावा लागताच संजय पाटील पसार झाले.

Post a Comment

Previous Post Next Post