ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या खुनातील मुख्य संशयीत आरोपी डॉ.विरेंद्र तावडे यांचा जामीन रद्द करावा.. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांची मागणी.


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर-ज्येष्ठ कामगार नेते गोंविद पानसरे यांची खुनाची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश (3) एस.एस.तांबे यांच्या कोर्टात चालू असून आज मंगळवार (ता.23). रोजी सुनावणी झाली.या वेळी यातील मुख्य सुत्रधार संशयीत आरोपी डॉ.विरेंद्र तावडे याला 2018 मध्ये जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.पण डॉ.तावडे यांच्या विरोधात पुरावे मिळाले असल्याने तेच खरा सूत्रधार असल्याने त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी आजच्या सुनावनी वेळी केली.

पुढ़ील सुनावणी 9 मे रोजी आहे.पोलिसांनी पानसरे यांच्या खुन प्रकरणातील दहा संशयीत आरोपीना अटक केली असून त्या पैकी समीर गायकवाड याला जामीन मंजूर झाला आहे.दुसरा संशयीत 2018 ला डॉ.तावडे याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने मंजूर केला होता .या प्रकरणी विशेष सरकारी वकील यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिल्याने जामीनाबाबत जिल्हा न्यायालयातच सुनावनी व्हावी .असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले होते.त्यानुसार डॉ.तावडे यांचा जामीन रद्द करण्याचा अर्ज सरकारी वकीलांनी दाखल केला होता.आज मंगळवारी झालेल्या सुनावनीत सरकारी वकील यांनी जोरदार युक्तीवाद करून डॉ.तावडे यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली.डॉ.तावडे यांचा मारेकरयांशी संपर्कात राहून त्यांना प्रशिक्षण देऊन गुन्हयांत वापरलेले शस्त्र त्यानेच पुरविले होते.त्यांच्या बरोबर बैठका घेऊन खूनाचा कट रचण्यात डॉ.तावडे यांचा सहभाग असल्याने तेच यातील मुख्य सूत्रधार असल्याने त्यांना जामीन मिळु नये असा युक्तीवाद सरकारी वकील यांनी केला.ही सुनावणी दुपारच्या सत्रात सुरु झाल्याने फक्त सरकारी वकील यांचाच युक्तीवाद होऊ शकला.पुढ़च्या सुनावणी वेळी बचाव पक्षाचा युक्तीवाद होणार आहे.या सुनावणी साठी विशेष सरकारी वकील शिवाजीरा राणे यांच्यासह बचाव पक्षाचे Ad.समीर पटवर्धन आणि Ad.विरेंद्र इंचलकरंजीकर उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post