अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमीचे लाक्षणिक उपोषण

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे प्रतिसाद संपूर्ण देशभर उमटताना दिसून येऊ लागले आहेत. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांनाही राजकारणात हे सगळं काय चाललं आहे..? असा प्रश्न आता पडू लागला आहे. *एकीकडे भ्रष्टाचार आणि घोटाळे करणारे अनेक नेते यांचा भाजप पक्ष प्रवेश होत असून भाजप त्यांना देशाच्या तसेच राज्याच्या राजकारणात मोठी जबाबदारी देत आहे, तर दुसरीकडे जे नेते भाजपा मध्ये जाण्यास तयार नाहीत त्यांना खोट्या आरोपांखाली अटक करून तुरुंगात डांबून ठेवण्यात येत आहे.* याचं सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी तसेच जनतेसमोर भाजपचा खोटारडेपणा आणण्यासाठी काल आम आदमी पक्षाच्यावतीने छत्रपती संभाजी उद्यान शिवाजीनगर च्या बाहेर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले गेले. सदर उपोषणात आम आदमी पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. कार्यकर्त्यांच्या वतीने कालच्या उपोषणात नागरिकांशी संवाद साधत तसेच सह्यांची मोहीम राबवत नागरिकांपर्यंत भाजपचा खोटारडेपणा पोहोचवण्याचा प्रयत्न केला गेला.

नरेंद्र मोदी यांनी आम आदमी पार्टी च्या प्रत्येक नेत्या आणि कार्यकर्त्याची धास्ती घेतली आहे. शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून विरोधकांना त्रास दिला जातो आहे, जेलमध्ये टाकले जात आहे. हे सर्व आत्ता सामान्य नागरिकांना हि माहिती झाले आहे. या वर्षीच्या सार्वजनिक निवडणुकीत सामान्य नागरिक बदल करण्यासाठी मतदान करणार हे निश्चित आहे. 

पुणे शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे

2024 मध्ये लोकसभा निवडणुका या भ्रष्ट भाजप सरकारला लोकशाहीच्या माध्यमातून भारतीय जनता त्यांचा पराभव करून त्यांना हद्दपार करून मतदान करणार आहे .

पुणे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर

देशभरात दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंदाजी केजरीवाल यांच्या दिल्ली, पंजाब सरकारमधील कामे पाहून विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. हा झंझावात संपूर्ण देशात वेगाने पसरतोय, सामान्य माणसाला केंद्रस्थानी धरून अरविंदजी नी कामे केली आहेत. यासाठीच कटकरस्थान करुन अटक केली आहे. यातून पक्षाचे नेते कधी शरण गेले नाहीत व पक्षाचे कार्यकर्ते ही झुकणार नाहीत. यासाठीच आम्ही संपूर्ण देशात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले यासाठी सामान्य नागरिक ही या उपोषणात सहभागी झाले. 

-अमित म्हस्के अध्यक्ष युवा आघाडी, आप पुणे

खोटा आरोप करून एखाद्या व्यक्तीच चारित्र्यहनन करण्यात नरेंद्र मेदी वस्ताद आहेत सत्ता मिळवण्यासाठी  खालच्या पातळी गाठू सकतात ह्याचा उत्तम उदाहरण दिल्लीचं  अरविंद केजरीवाल सरकार आहे. काही ही सबळ पुरावा नस्ताना आपच्या पहिल्या फळीतील नेत्यांना तुरूंगात डांबून ठेवला आहे.आणि 

दारू घोटाळ्याचा किंगपिंग शरतचंद्र रेड्डी कडून भाजप ने ५६ कोटी ची देणगी घेतली आहे ईडी सीबीआय कधी चौकशी करणार. का ह्या देशात दोन कायदे आहेत विरोधी पक्षसाठी वेगळा कायदा आणि सत्ता पक्षसाठी वेगळा कायदा 

-सतीश यादव महासचिव आप,पुणे

सतीश यादव, अक्षय शिंदे, अमोल मोरे, सुरेखा भोसले, सचिन कोतवाल, प्रशांत कांबळे, संजय कोने,निरंजन अडागळे, मंजुनाथ मणुरे, सुनिता काळे, माधुरी गायकवाड, प्रीती निकाळजे, शरद गायकवाड Fabian aana samson , मोहम्मद जमादार,रितेश राहुल निकाळजे,डॉ. योगेश ठाकरे,शितल कांडेलकर, केतन फडके,महेश सोनवणे, विलास नाईक, 

 कैलास तेलोरे , कृष्णा नाईक, योगेश जाधव, राम राठोड, चेतन कुलकर्ण बळीराम शहाणे . उमेश बागडे. अजगर बेग. किरण कांबळे. कानिफनाथ घोरपडे *पुजा वाघमारे*,Rubina kazmi ॲड गणेश थरकुडे, नौशाद अन्सारी , अभिजीत वाघमारे- पवन शेट्टी, आदित्य जाधव, मोनीश चव्हाण, आकाश चव्हाण, धनराज शेलार, हर्षवर्धन जाधव, साईराज शेलार, प्रज्वल गायकवाड, विक्रम भगत, महेश खोमणे.नितीन पायगुडे, सुनील सवदी, अविनाश भाकरे,मयुर कांबळे

Post a Comment

Previous Post Next Post