पुणे : आज पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज

प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाने  रविवारी, २१ एप्रिल रोजी पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील आठवड्यात शहरातील हवामान मुख्यत: स्वच्छ राहण्याचा अंदाज असून दिवसाचे तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहील, पुण्यात किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

पुण्यातील पुढील ७ दिवसांचे हवामान

या आठवड्यात शहरात अनेक दिवस पावसाने हजेरी लावली आणि शनिवारीही पावसाची नोंद झाली. दरम्यान, वृत्तानुसार, पुण्यात मंगळवार आणि बुधवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे झाडे पडणे, पाणी साचणे आणि वीज खंडित होण्याच्या घटना घडल्या. 

वाघोली, लोहेगाव, खराडी, कोंढवा खुर्द, विश्रांतवाडी, धानोरी, औंध, कोथरूड, बिबवेवाडी, पद्मावती, कात्रज, बालाजीनगर, बाणेर, पाषाण, आणि बावधन.अग्निशमन दल आणि महावितरणला मंगळवारी असंख्य कॉल्स आले. दोन तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित होता, तर वाघोलीत सायंकाळी ६ ते पहाटे ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित होता.

Post a Comment

Previous Post Next Post