पुण्यात महत्वाचे विकास प्रकल्प भाजपमुळे रखडले – आ. रवींद्र धंगेकर

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुण्यातील विकास कामांबाबत दूरदृष्टी आणि काम पूर्ण करून घेण्याची धमक नसल्यामुळेच गेली १० वर्षे केंद्रात, राज्यात व पुण्यात सत्तेवर असणाऱ्या  भारतीय जनता पक्षामुळे पुण्यातील अनेक मोठे प्रकल्प रखडले. मुठा नदी सुधारणा ( जायका ) प्रकल्प, स्मार्ट सिटी, पुण्याची मेट्रो, पुणे अंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार, पुण्याहून अनेक शहरांकडे जाणाऱ्या नव्या रल्वे गाड्या असे कोणतेच प्रकल्प भाजप करू शकले नाही.

 मेट्रो तर गेल्या १० वर्षात पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे पुणेकरांचे मोठे नुकसान झालेले असून या  परिस्थितीत परिवर्तन करीत महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या काँग्रेसला मतदान यंत्रावरील पंजाच्या चित्रापूढील बटन दाबून विजयी करा असे आवाहन पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केले. 

कोथरूड मधील प्रभाग क्र. ११ रामबाग कॉलनी – शिवतीर्थनगर येथे रविवारी सायंकाळी निघालेल्या विराट पदयात्रेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. 

   कोथरूड विधानसभा मतदार संघातील प्रभाग क्र. ११ मधील ही पदयात्रा ना भूतो ना भविष्यती अशी झाली सुमारे ४००० हून अधिक कार्यकर्ते व नागरिक या पदयात्रेत सहभागी झाले होते. 

पदयात्रेत महिलांचा सहभाग मोठा होता तसेच अनेक ठिकाणी महिला गटागटाने उभ्या राहून रवींद्र धंगेकर यांना ओवाळत होत्या. अनेक ठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्ठी करण्यात आली. या पदयात्रेत ठिकठिकाणी पथनाट्य आयोजित केली गेली. ‘लोकायत संस्थेतर्फे’ पथनाट्याद्वारे काँग्रेसच्या योजनांची माहिती दिली गेली. याचे सूत्रसंचालन कोथरूड ब्लॉक अध्यक्ष रवींद्र माझिरे आणि यशराज पारखी यांनी केले. या पदयात्रेचे संयोजन माजी जेष्ठ नगरसेवक रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी केले.  याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे  संतोष डोख व दिपाली डोख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात शेकडो      कार्यकर्त्यांसह कालच्या रॅलीत प्रवेश केला.   

पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती. 

  या पदयात्रेत रवींद्र धंगेकरांनी श्री विठ्ठल मंदिर, श्री राम मंदिर, श्री देवी मंदिर येथे फुलांचा हार अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले. पदयात्रेत काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी व सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या पक्षांचे झेंडे पदयात्रेत डौलाने फडकत होते. विशेष म्हणजे केळेवाडी परिसरात काँग्रेसचे जेष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देखील सहभागी होते. पदयात्रेत पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक मंडळांना भेटी दिल्या तेव्हा पाठिंब्याच्या जोरदार घोषणा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. 

   मा. चंदूशेठ कदम यांचे ऑफिस – म्हातोबानगर पासून पदयात्रेस सुरुवात झाली – राजमाता जिजाऊनगर (सुतारदरा) – शिवकल्याण गणपती गल्ली क्र. ११ – क्रांतीसेना कमान – जुने विठ्ठल मंदिर – गल्ली क्र. ३१ – गल्ली क्र २८ पांडुरंगनगर – समर्थ चौक – माथवड चौक ते जयभवानीनगर क लाईन – गुरुदत्त चौक,किष्किंधानगर – रामबाग कॉलनी – शंकरराव मोरे विद्यालय ऑफिस समोरून – मोरे श्रमिक वसाहत – राउतवाडी – हनुमाननगर – राजीवगांधी पार्क – इंदिरा पार्क – केळेवाडी विठ्ठलमंदिर ए.आर.ए.आय रोड – आदर्श मित्रमंडळ – विश्वशांती मंडळ – जय श्रीराम तरुण मंडळ येथे समाप्त झाली.

        

   पदायत्रेत उमेदवार रवींद्र धंगेकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी जेष्ठ नगरसेवक चंदूशेठ कदम, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार, माजी नगरसेवक योगेश मोकाटे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, आम आदमी पार्टी शहर प्रमुख सुदर्शन जगदाळे धनंजय बेनकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुणे उपशहर प्रमुख राजस पळसकर,पुणे शहर काँग्रेस महिला अध्यक्षा पूजा आनंद, कोथरूड ब्लॉक अध्यक्ष रवींद्र माझिरे, महिला ब्लॉक अध्यक्ष मनीषा करपे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ब्लॉक अध्यक्ष स्वप्नील दुधाणे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडी सविता मते, अभिजित मोरे, अमोल काळे , पुणे शहर महिला संघटक सचिव नैना सोनार, महिला उपशहर प्रमुख दुधाणे ताई, पुणे शहर उपाध्यक्ष विजयश्री खळदकर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि आम आदमी पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे ४ तास चालेली ही विशाल पदयात्रा रात्री ९.३० च्या सुमारास संपली.  

अरविंद शिंदे अध्यक्ष 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी 

९८२२०२०००५

Post a Comment

Previous Post Next Post