महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर, सुप्रिया सुळे व डॉ. अमोल कोल्हे यांचे अर्ज दाखल

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे : महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे शहर व जिल्यातील लोकसभा निवडणुकीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (पुणे), सुप्रियाताई सुळे (बारामती) आणि डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

या वेळी काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जेष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आ. विश्वजित कदम, राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन आहिर, उपनेत्या सुषमा अंधारे,आम आदमी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अभिजित फाटके, माजी आमदार व पुणे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी, आमदार रोहित पवार, संजय जगताप, संग्राम थोपटे, माजी आमदार रमेश बागवे, दीप्ती चवधरी, जयदेव डोळे, उल्हासदादा पवार, संजय बालगुडे, अंकुश काकडे, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पुणे लोकसभा निवडणूक समन्वयक अरविंद शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन थरकुडे, आम आदमी पक्षाचे सुदर्शन जगदाळे व धनंजय बेनकर, संभाजी ब्रिगेडचे संतोष जाधव यावेळी उपस्थितीत होते.

       काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, पदाधिकारी व हजारोंच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करणयात आला. यावेळी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतर्फे शक्ती प्रदर्शन करण्यात आले.

     गुरुवारी निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे कार्यकर्ते सकाळी नऊ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात एकत्रित आले होते. सकाळी पावणे अकराच्या सुमारास

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला  रवींद्र धंगेकर (पुणे) आणि डॉ. अमोल कोल्हे (शिरूर)  आणि  सुप्रियाताई सुळे यांनी पुष्पहार अर्पण करून  वंदन केले.  रवींद्र धंगेकर (पुणे) आणि डॉ. अमोल कोल्हे (शिरूर) हे जिल्हाधिकारी कार्यालयात आणि सुप्रियाताई सुळे (बारामती) यांनी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात निवडणूक अर्ज दाखल केला. 

   महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या दालनात जाऊन अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार उल्हास पवार, माजी खासदार एड वंदना चव्हाण, पुणे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख व माजी आमदार मोहन जोशी आणि माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे यांनी  उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या अर्जावर सूचक म्हणून सह्या केल्या.  

    रवींद्र धंगेकर सच्चा पुणेकर

  सर्वसामान्यांचा चेहरा 'रविंद्र धंगेकर'च होणार पुण्याचा खासदार

कसबा विधानसभा मतदार संघातील मतदारांनी रविंद्र धंगेकर यांना कौल देऊन 28 वर्षांनंतर भाजपला खिंडार पाडून त्यांना विजयी केले. त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी भाजपला 40 स्टार प्रचाराकांची फौज मैदानात आणावी लागली होती.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री हे देखील तळ ठोकून प्रचारात उतरले होते. 

मात्र मोदी सरकारविषयी जनसामान्यांत प्रचंड रोष होता. हा रोष मतदारांनी मतदानातून व्यक्त केला. मोदी सरकारच्या महागाई, बेरोजगारी,  गुन्हेगारी व भ्रष्टाचारला नागरिक वैतागले होते. मोदी सरकारविषयी संताप व्यक्त करण्यासाठी नागरिक पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना विक्रमी मतांनी विजयी करणार आहे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. 

आता रविंद्र धंगेकरच पुण्याचे प्रश्न सोडवतील. जनतेचा कायम त्यांना पाठींबा राहिला असून रात्रीबेरात्री नागरिकांच्या कामाला धावून जातात, अशी त्यांची ख्याती आहे. त्यामुळे सामान्यांपासून उच्चभ्रू लोकांपर्यंत ते सर्वांचे लाडके नेते आहे.  त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. भाजपाने कितीही स्टार प्रचारक, नेते, मंत्री, पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या, तरी  आता परिवर्तन होणे अटळ आहे. आता भाजपाला घरचा रस्ता पुणेकर दाखवणार आहेत.  सर्वसामान्यांचा चेहरा पुण्याचा खासदार रविंदार धंगेकर  हेच होणार, अशी चर्चा पहिल्याच दिवशी  नागरिकांमध्ये सुरू होती.

Post a Comment

Previous Post Next Post