खळबळ जनक बातमी : -मटका किंग विजय पाटील सह 12 जण कोल्हापूर जिल्हयातुन एक वर्षासाठी हद्दपार ..


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - कोल्हापुरात मटका किंग अशी ओळख असलेला आणि मटका टोळीचा प्रमुख  विजय लहू पाटील (रा.विजय प्लाझा देवकर पाणंद,को )याच्यासह त्याच्या 12 जणांवर पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत आणि हद्दपारीची कारवाई करण्यात आली.यात विजय लहू पाटील यांच्यासह त्याचे साथीदार राहुल बाळु गायकवाड (यादवनगर),अजित सर्जेराव इंगळे (रा.टिंबर मार्केट),संदिप बाळासाहेब राऊत(रा.शिवाजी पेठ),प्रकाश नागनाथ गाडीवडर (रा.सानेगुरुजी वसाहत),दिलीप जगन्नाथ अधिकारी (रा.संभाजीनगर),आनंदा श्रीपती दुकांडे(रा.वेताळमाळ तालीम), चैतन्य विलास बंडगर(रा.क्रशरचौक),विष्णु नारायण आंग्रे (काटे भोगाव),निरंजन वसंत ढ़ोबळे (रा.मंगळवार पेठ),कुलदिप राजाराम लांबोरे (रा.मंगळवार पेठ),आणि नंदकुमार पंडीतराव चोडणकर (रा.गंगावेश) याचा समावेश आहे.

कोल्हापूर जिल्हयासह शहरात आणि ग्रामीण भागातील सुरु असलेल्या अवैद्य व्यवसायाची आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी तयार करून त्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारी यांना दिल्या होत्या.त्या अनुशंगाने कोल्हापूरसह करवीर तालुक्यात राजरोस मटका घेत असलेली टोळीचा मटका किंग अशी ओळख असलेला प्रमुख विजय पाटील यांच्यासह त्याच्या 12 साथीदारांचा जुना राजवाडा पोलिसांनी प्रस्ताव तयार करून या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक यांच्या कडे सादर केला होता.या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलिस  अधिकारी इंचलकरंजी यांनी करुन त्याचा अहवाल पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांच्याकडे सादर केला .चौकशी अधिकारी यांनी चौकशी दरम्यान वेळोवेळी सुनावणी घेऊन त्यांना सुधारण्यासाठी अवधी देऊनही या टोळीवर कोणताच परिणाम न झाल्याने तसेच या व्यवसायात तरुण पिढी वाममार्गाला लागुन गुन्हेगारीकडे वळत असल्याने         जिल्हयात कायदा आणि सुव्यवस्था आबाधित रहाण्यासाठी आणि येणारी लोकसभा निवडणुका सुरळीत पार पडण्यासाठी पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी ता.08/04/2024 रोजी या बारा जणांच्यावर हद्दपारीचा आदेश दिल्याने जुना राजवाडा पोलिसांनी त्याची अंमलबजावणी केली.

वरील 12 जणा पैकी कोल्हापूर जिल्हयातुन हद्दपार झालेली व्यक्ती आढ़ळल्यास जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा किंवा नियंत्रण कक्ष 0231-2662333 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post