मेकर ग्रुपच्या दोघांना अटक. ,आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- मेकर ग्रुपच्या फरारी असलेल्या सुरेश चामाजी जुन्नुरे (वय 65.रा.रत्नदिप कॉलनी,भांडुप) आणि श्रीधर हरिशचंद्र खेडेकर (वय 55.रा.पिंपळे गाव,पुणे) या दोघांना आर्थिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी अटक केली आहे.

या आरोपीच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून यातील सुरेश जुन्नुरे याला ता.12/04/24 रोजी अटक केली असून त्याला 15/04/24 प्रर्यत पोलिस कोठडी मिळाली असून श्रीधर खेडेकर याला 13/04/24 रोजी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 18/04/24 अखेर पोलिस कोठडी सुनावली आहे

.या गुन्हयाचा तपास पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू असून या गुन्हयातील आरोपींना अटक करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने ता.08/12/23 रोजी विशेष पथकाची नेमणूक केली होती.या पथकाने आता प्रर्यत यातील मुख्य आरोपी रमेश महादेव वळसे - पाटीलसह 15 आरोपींना अटक केली आहे.आज अखेर 

पोलिसांनी 18 आरोपींना अटक केली आहे.उर्वरीत 5 आरोपीच्या शोधासाठी पुणे आणि पालघर या ठिकाणी पोलिस पथके रवाना झाली आहेत.पोलिसांनी आज अखेर 2 कोटी 35 लाखांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे.तर  2 लाख 10 हजार किमंतीची जंगम मालमत्ता जप्त करून 1 लाख रुपयेची फिक्स एफडी सिल करण्यात आली आहे.सदर मिळकतीवर  एमपीआयडी कायद्या अंतर्गत उपविभागीय अधिकारी,करवीर विभाग यांची प्राधिकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे.यातील आरोपींच्या स्थावर मालमत्ताची माहिती मिळाली असून सदर मिळकतीचे शासकीय   मुल्यांकन करून एमपीआयडी कायद्या अंतर्गत कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post