महामानव डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी बिंदु चौकात उसळला भिमसागर .



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त एऐतिहासिक बिंदु चौकात शनिवारी रात्री त्यांना अभिवादन करण्यासाठी भिम सागर उसळला होता.या वेळी समाजातील सर्व स्तरातील नागरिक,सामाजिक आणि राजकिय क्षेत्रातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.



या वेळी बोलो रे बोलो जय भिम बोलो या जयघोषाने ढ़ोल ताशांच्या गजरात परिसर दणाणुन सोडला.या वेळी 12 वाजून 1 मि.आतिष बाजी करण्यात आली.या वेळी बुध्द वंदना घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करण्यात आले.अभिवादन करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज ,मा.आ.सतेज पाटील,वसंतराव मुळीक ,बाबासाहेब भोसले ,स्वाती काळे, संयुक्त जंयती उत्सव सिध्दार्थनगर मंड़ळाचे अध्यक्ष करण भोसले ,संदिप माळी,सुरक्षा सोहणी,रजनिकांत सरनाईक यांच्यासह पुढ़ील ओळ घ्यावी. यांच्यासह पुरुष,महिला ,लहान मुलेसह आबालवृद्ध यांनी अभिवादन केले.





Post a Comment

Previous Post Next Post