अश्लिल मेसेज करून पाच लाखांची खंडणी मागणारा राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - एका महिलेच्या पतीच्या फ़ेसबुकवर अश्लिल मेसेज पाठवून पाच लाखांची मागणी करत महिलेचा पाठलाग करून विनयभंग करणारा संशयीत शुभम सदाशिव खेतल (वय 27.रा.बागल चौक) याला रविवारी (ता.7) रात्रीच्या सुमारास  राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. हा प्रकार जाने.23 ते एप्रिल 24.च्या दरम्यान घडला असून पोलिसांनी दिलेल्या माहितीद्वारे शुभम खेतल हा या महिलेचा वारंवार पाठलाग करून त्रास देत होता .

सदर महिलेने याकडे दुर्लक्ष केल्याने तिच्या पतीच्या फ़ेसबुकवर अश्लिल मेसेज पाठवून तिची बदनामी करून महिलेच्या पतीकडे पाच लाखांची खंडणीची मागणी केली.या महिलेच्या दुचाकीचा पाठलाग करून रस्त्यात अडवत तिचा विनयभंग करून तुझी सोशल मिडीयाद्वारे  बदनामी करण्याची धमकी दिल्याने शेवटी या महिलेने राजारामपुरी पोलिस ठाण्यात शुभम खेतल विरोधात फिर्याद दिल्याने पोलिसांनी अटक करून त्याच्याकडे चौकशी करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post