आंबेवाडी परिसरात अवैद्य दारु साठा जप्त.

 कार सह पावणे साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त.

करवीर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर -करवीर तालुक्यातील आंबेवाडी परिसरात करवीर पोलिसांच्या वतीने गस्त घालत प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करीत असताना शनिवारी आंबेवाडी परिसरात अवैद्य देशी -विदेशी दारुची वाहतूक करणारी कारची तपासणी केली असता त्यात 1लाख 70 हजार रुपयांचा मद्य साठा मिळुन आला असता तो जप्त करून या प्रकरणी संशयीत पांडुरंग धोंडीराम पाडेकर (वय 58.रा.निवडे ता.पन्हाळा) यास अटक केली.

करवीर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक.किशोर शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाला अवैद्य व्यवसायाची माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव आपल्या स्टाफ समवेत संशयीत वाहनांची कसून तपासणी करीत असताना पोलिसांना खबरयां कडून पांढ़री कार मधून बेकायदेशीर मद्याची वाहतुक होत असल्याची माहिती मिळाली असता पोलिसांनी आंबेवाडी मार्गावर सापळा रचून साध्या वेशातील पोलिस प्रत्येकक वाहनावर लक्ष ठेवून होते.सदरची कार येताना दिसताच त्या वाहनाला थांबवून कार मधील कार चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवा उडवी केली.त्याचा पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिला असता आपण देशी विदेशी दारुची वाहतूक करत असल्याचे सांगितले.पोलिसांनी कारसह मद्य साठा जप्त केला.

यात पोलिस अंमलदार सुभाष सरवडेकर ,सुजय दावणे प्रकाश कांबळे,विजय पाटील यांच्यासह त्यांच्या सहकारयांनी सहभाग घेतला.

Post a Comment

Previous Post Next Post