कारवाई न करण्यासाठी दोन हजाराची लाच घेताना महिला पोलिस ताब्यात.

 

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर/गडहिंगलज - तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीवर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी दोन हजाराची लाच घेताना महिला हेड.कॉ.रेखा भैरु लोहार (रा.हरळीरोड ,भडगाव ता.गडहिंगलज ) यांना लाचलुचपतच्या पथकाने कारवाई करून ताब्यात घेतले.

अधिक माहिती अशी की,तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीवर गडहिंग्लज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे दोन हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.दरम्यान तक्रारदाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार केली असता या पथकाने त्याची पडताळणी करून तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची स्वतः लाच घेताना पकडून आरोपीच्या विरोधात गडहिंग्लज पोलिस ठाण्यात उशीराप्रर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

ही कारवाई लाचलुचपतचे पोलिस उपअधीक्षक श्री.सरदार नाळे,पोलिस निरीक्षक श्रीमती आसमा मुल्ला ,सपोफौ.प्रकाश भंडारे यांच्यासह त्यांच्या पथकाने केली.

कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी किंवा त्याच्या वतीने अन्य कोणी लाचेची मागणी केल्यास याची माहिती लाचलुचपत विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post