गोळीबार प्रकरणी एस.एम.टोळीच्या अग्निशस्त्रासह दोघांना अटक



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर - जवाहरनगर येथे असलेल्या यादव कॉलनी येथे रहाणारा साद शौकत मुजावर (वय 29.रा.यादव कॉ.सरनाईक वसाहत ) याच्यावर गोलीबार करून जखमी केल्या प्रकरणी  सद्दाम मुल्ला आणि साहील नदाफ या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक करून पोलिसांनी शस्त्रे जप्त केली आहेत.

हा प्रकार रविवारी रात्री 11च्या सुमारास घडला होता.गोळीबार झाल्याचे समजताच त्या परिसरात मोठी खळबळ उडाली होती.या प्रकरणी पोलिसांत पाच ते सात जणांवर राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यापैकी दोघांना अटक केली आहे.गोळीबाराची माहिती समजताच पोलिस अधीक्षक मा.महेन्द्र पंडीत यांनी उपविभागीय  पोलिस अधिकारी श्री.अजित टिके ,करवीर उपवीभागीय पोलिस अधिकारी सुजित क्षीरसागर आणि राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांना घटना स्थळी पाठविले.त्यानी सीपीआर रुग्णालयात येऊन जखमी साद मुजावर यांच्या कडुन माहिती घेतली असता सद्दाम मुल्ला मोका अंतर्गत तडीपार गुन्हेगार असून यांच्या अंतर्गत वादातुन साद हा रात्री 11च्या सुमारास बसलेला असताना अचानक येऊन सद्दाम मुल्ला ,मोहसीन मुल्ला ,मनीष नागोरी आणि साहील नदाफ यांनी त्यांच्या कडील पिस्टल या अग्निशस्त्रातुन गोळीबार करून आणि धारदार शस्त्राने डोक्यात वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला असे साद मुजावर यांनी पोलिसांना माहिती दिली.असता स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आणि राजरामपुरी पोलिसांनी संयुक्तरित्या तपास करून सद्दाम सत्तार मुल्ला (रा.यादवनगर) आणि साहील रहीम नदाफ(वय 22.रा.यादवनगर) या दोघांना अटक करून त्यांच्या कडुन गुन्हयात वापरलेले अग्निशस्त्र जप्त करण्यात आले आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.अजित टिके ,करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुजित क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर यांच्यासह त्यांच्या पथकाने आणि राजारामपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्यासह त्यांच्या टीमने केली.

Post a Comment

Previous Post Next Post