मोरेवाडी येथे कंजारभाट वस्तीवर छापा टाकून 8 दारु भट्ट्या उध्वस्त.

 स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई.

प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

कोल्हापुर- कोल्हापूर शहर आणि उपनगरात चालू असलेल्या अवैद्य व्यवसायाची माहिती घेऊन त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या वरिष्ठ अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला दिल्या होत्या.


त्यानुसार या पथकाने माहिती घेत असताना या पथकाला करवीर तालुक्यातील मोरेवाडी परिसरातील कंजारभाट वस्तीवर पहाटेच्या वेळी गावटी दारु तयार करीत असल्याची माहिती मिळाली असता या पथकाने 06/04/24 रोजी पहाटेच्या सुमारास छापा कंजारभाट वस्तीवर गावटी हात भटीची दारु तयार होत असलेल्या एकूण 08 भट्ट्यावर छापा टाकून हातभट्ट्या नष्ट केल्या .या ठिकाणी गावटी दारु तयार करण्यासाठी वापरात असणारे 600/लि.कच्चे रसायन,390/लि.पक्के रसायन,260/लि.गावटी हातभटीची दारु आणि इतर साहित्य असा एकूण 61,500/किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला.या प्रकरणी प्रकाश बागडे ,शक्ती क्रांती मांटुगे ,चरण विरासिंग बागडे,प्रमोद सुनिल बागडे ,मनोज मोहन मिणेकर ,शेखर ठोकर्सिंग मच्छले,अजित बांटुगे,रोहित प्रकाश मांटुगे,(सर्व रा.कंजारभाट,मोरेवाडी) यांच्या विरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक मा.महेंद्र पंडीत,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमळकर,स.पो.नि.सागर वाघ ,महिला स.फौ.श्रीमती शहनाज कनवाडे ,अमर आडुळकर ,अमित सर्जे ,विनायक चौगुले ,युवराज पाटील ,ओंकार परब आदीनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post